rajya sabha election result : राष्ट्रवादीनं शिवसेनेवर फोडलं पराभवाचं खापर

संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला. या पराभवाविषयी सध्या शिवसेना आत्मचिंतन करीत आहे.
Jayant Patil, Uddhav Thackeray
Jayant Patil, Uddhav Thackeraysarkarnam

पंढरपूर : नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha election result ) शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला आहे. या पराभवाविषयी सध्या शिवसेना आत्मचिंतन करीत आहे. संजय पवार यांच्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर फोडत आहेत.

राज्यसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या पराभवा‌विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारले असता त्यांनी या पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी मारले आहे.

"अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना होती, निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती," असे सांगत, शिवसेनेच्या पराभवा‌बाबत जयंत पाटील यांनी चक्क हात वर केले आहेत.

मंत्री जयंत पाटील शनिवारी माळशिरस तालुक्यातील गारवाड येथे पाझर तलावांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी‌ राज्यसभा निवडणूक निकालावर ही प्रक्रिया दिली. काल दिवसभर राज्यसभा निवडणुकीतील जय-पराजयाची चर्चा सुरू असतानाच मंत्री जयंत पाटील यांनी मात्र पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी मारले आहे.

Jayant Patil, Uddhav Thackeray
Rajya Sabha : कोणते आमदार फुटले ? परब, देसाईंवरचा विश्वास ठाकरेंना नडला

महाविकास आघाडी सोबत असलेल्या पाच ते सहा अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केले नाही. परंतु त्यांची आताच नावं घेणे योग्य होणार नाही, असे सांगत आमदार संजय शिंदे आणि देवेंद्र भोयर यांची त्यांनी पाठराखण केली.

"आम्ही सर्व जण पहिल्या पसंतीच्या मताकडे लक्ष दिले पण दुसऱ्या पसंतीच्या मतांनी आमचा घात केला. आजही पहिल्या पसंतीची १६३ मते महाविकास आघाडी सोबत असून सरकारला कोणताही धोका नाही," असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com