आमदार अरुण लाड यांच्या कामामुळे विरोधकही घायाळ : जयंत पाटलांकडून भरसभेत कौतुक

पलूस-कडेगाव मतदारसंघात पक्षाचे कामही जोरात सुरू आहे आणि बघता बघता राष्ट्रवादीने या मतदारसंघात बाळसं धरलं आहे.
आमदार अरुण लाड यांच्या कामामुळे विरोधकही घायाळ : जयंत पाटलांकडून भरसभेत कौतुक
Palus-Kadegaon NCPSarkarnama

पलूस (जि. सांगली) : पलूस-कडेगाव (Palus-Kadegaon) तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp) बांधणी चांगली झाली आहे. आमदार अरुण लाड (MLA Arun Lad)) यांनी केलेल्या संघटनात्मक कार्यामुळे विरोधकही घायाळ झाले आहेत. तळापासून संघटना अधिक भक्कम करावी. संघटना विचारांवर आधारित असली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. (Jayant Patil appreciates the work of MLA Arun Lad)

Palus-Kadegaon NCP
मोठी बातमी : ओबीसी महामंडळाच्या कर्ज वसुलीस स्थगिती : मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

पलूस येथे पलूस-कडेगाव तालुक्याच्या राष्ट्रवादी संवाद यात्रेच्या बैठकीत पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अरुण लाड होते. पाटील यांनी पलूस आणि कडेगाव तालुका राष्ट्रावादी काँग्रेसच्या युवक, युवती आणि सर्व विभागांच्या अध्यक्षांशी अडीअडचणींबाबत चर्चा केली. जयंत पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निर्णय घेतला आणि पश्चिम महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली. सर्वांच्या मेहनतीने ही जागा निवडून आली आहे. अरुण लाड येथे चांगले काम करत आहेत. पक्षाचे कामही जोरात सुरू आहे आणि बघता बघता राष्ट्रवादीने या मतदारसंघात बाळसं धरलं आहे.

Palus-Kadegaon NCP
राष्ट्रवादीची सत्ता येताच सोनेरी टोळी पुन्हा सक्रीय : भाजपच्या पृथ्वीराज पवारांचा हल्लाबोल

आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. महाराष्ट्रात फार कमी मतदारसंघ आहेत जिथे पैकीच्या पैकी पदाधिकारी उपस्थित होते. पलूस कडेगाव त्यापैकी एक आहे, असे कौतुक जयंत पाटील यांनी केले.

Palus-Kadegaon NCP
सोलापूर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल : नव्या नियुक्तांमध्ये कोठेंची भूमिका महत्वाची ठरणार

लाड म्हणाले, जयंत पाटील राज्यभर संघटनात्मक काम करत आहेत. या दिंडीतील प्रत्येक वारकरी हा प्रामाणिकपणे राष्ट्रवादीशी जोडलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, महागाईच्या भडक्याने केंद्र सरकारने काय साध्य केले, याचा जाब विचारायचा असेल, तर संघटनात्मक ताकद वाढवली पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य शरद लाड म्हणाले, पक्षाचा कोणताही उपक्रम ताकदीने आम्ही इथे राबवतो. नव्याने जे कार्यकर्ते जोडले ते निष्ठावंत जोडले, ते सर्व शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरीतच झालेले आहेत. ईडीची रडी आपण आक्रमकतेने हाणून पाडू शकतो, यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा.

Palus-Kadegaon NCP
...मोदीसाहेब माझी विशेष काळजी घेत आहेत : राजू शेट्टींचे वक्तव्य!

या वेळी आमदार सुमनताई पाटील, किरण लाड, सुनील गव्हाणे, प्रतीक जयंत पाटील, मेहेबूब शेख, युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष विराज नाईक, क्रांती साखर कारखान्याचे संचालक दिगंबर पाटील, गुत्तांना बाबर, नितीन नवले, अविनाश पाटील, सुश्मिता जाधव यांच्यासह पलूस-कडेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.