गोरे, जानकरांना धक्का; देवापूर-पळसावडे सोसायटीत राष्ट्रवादी, काँग्रेसची सत्ता...

विकासासाठी For development एकत्र आलेल्या राष्ट्रवादी NCP व काँग्रेस Congress supporters कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार Disciplined propaganda करत सत्तांतर घडविले.
Mahadev Jankar, Jaykumar Gore
Mahadev Jankar, Jaykumar Goresarkarnama

म्हसवड : देवापूर (ता. माण) येथील देवापूर - पळसावडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनेलने भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे व माजी मंत्री, आमदार महादेव जानकर यांच्या शंभू महादेव पॅनेलनचा १२-१ असा पराभव धुव्वा उडवून दिला आणि विजयश्री खेचून आणली आहे. या सोसायटीत तब्बल पंधरा वर्षांनंतर सत्तांतर घडले आहे.

माणच्या पूर्व भागात देवापूरच्या विकास सोसायटी निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कोणत्याही स्थितीत सत्ता कायम ठेवणार असा विश्वास बाळगून सत्ताधारी व आमदार जयकुमार गोरे व आमदार महादेवराव जानकर यांचे कार्यकर्ते हे शंभू महादेव पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत होते. तर, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून समविचारी एकत्र आले होते.

Mahadev Jankar, Jaykumar Gore
राष्ट्रवादीला शिंगावर घेण्यासाठी भाजपने आखली रणनिती: जिल्हाध्यक्षपदी जयकुमार गोरेंची निवड

देवापूर व पळसावडे कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीसाठी दोन्ही पॅनेलने प्रत्येक मतदारांपर्यंत पोचून प्रचार केला. ८३० मतदानापैकी ७६५ मतदान झाले. विकासासाठी एकत्र आलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार करत सत्तांतर घडविले. निकालानंतर कार्यकत्यांनी जल्लोष केला. श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार : रावसाहेब बाबर, ज्ञानदेव काळे, सिध्दनाथ जाधव, भास्कर बाबर, मधुकर कांबळे, पांडुरंग पिसाळ, मारुती यादव, सौ. मंगल बाबर, सौ. लक्ष्मी जाधव, सुनिल क्षीरसागर, बबन जाधव, आगतराव बनसोडे तर विरोधी पॅनेलचे उत्तम बाबर हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत.

Mahadev Jankar, Jaykumar Gore
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी सरपंच शहाजी बाबर, उपसरपंच मंगल चव्हाण, शेती सोसायटी अध्यक्ष जगन्नाथ माने , किरण बाबर, आनंदा बाबर, रामदास बाबर, पै. विशाल जाधव, बाबासाहेब बनसोडे, नितीन चव्हाण, अशोक बनसोडे, सुनिल बाबर, सुहास चव्हाण, शांताराम जाधव, सागर काळे, सर्जेराव व्हरकाटे, सयाजी जानकर, शिवाजी यादव, तात्यासो औताडे कुंडलिक यादव, भागवत सरतापे, मधुकर चव्हाण, पांडुरंग यादव, बंडू शेंडगे, सुरेश दादासो बाबर आदींनी परिश्रम घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com