जावळीचे सुपूत्र जवान प्रथमेश पवार यांना जम्मूत वीरमरण

सैन्यदलात Army दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना While performing national service प्रथमेश यांना वीरमरण Heroic death आले. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर Jawali Taluka शोककळा पसरली आहे.
Prathamesh Pawar
Prathamesh Pawarsarkarnama

कुडाळ : जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना जम्मू सांबा ब्लॉक येथे झालेल्या चकमकीत रात्री साडे दहाच्या सुमारास वीरमरण आले. त्यांचे पार्थिव उद्या (रविवारी) बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रथमेश संजय पवार हे तीन महिन्यांपूर्वीच सैन्यदलात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच पवार यांनी पाहिले होते. ते स्वप्न वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पूर्ण केले. अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. शहिद प्रथमेश यांचे मावसभाऊ अमोल गंगोत्रे (रा. बामणोली तर्फ कुडाळ) यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजी रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात कर्तव्य बजावत होते.

Prathamesh Pawar
भामरागड तालुक्यात पोलिस - नक्षल चकमकीत एक जवान जखमी

त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश यांना गोळी लागली. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याची माहिती त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहीद प्रथमेश पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण घेतले.

Prathamesh Pawar
किसान आर्मी करणार पंतप्रधानांना एक लाख फोन 

प्राथमिक शिक्षण बामणोली तर्फ कुडाळ येथे झाल्यानंतर बारावीपर्यंत पाचवड येथील विद्यालयामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सैन्यदलात त्यांचे सिलेक्शन झाले. सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना प्रथमेश यांना वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in