जरंडेश्वर कारखाना तीन दिवस बंद; आयकर अधिकऱ्यांची कारवाई सुरू

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर कारखान्यावर येऊन 'जरंडेश्वर'चा मालक कोण? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, अशा शब्दांत आव्हान दिले होते.
जरंडेश्वर कारखाना तीन दिवस बंद; आयकर अधिकऱ्यांची कारवाई सुरू
Ajit Pawar, Kirit Somayyasarkarnama

कोरेगाव : चिमणगांव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तीन दिवस कारखाना बंद ठेवण्यात आल्याचे सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सातच्या सुमारास चार वाहनांतून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारी, पोलिसांनी कारखान्यात प्रवेश करून कारवाई सुरू केली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कालच जरंडेश्वर कारखान्यावर येऊन 'जरंडेश्वर'चा मालक कोण? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, अशा शब्दांत आव्हान दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (गुरुवार) ही कारवाई सुरू आहे. कारखान्याचे गेट बंद असून, आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

Ajit Pawar, Kirit Somayya
मी नियमाने वागणारा माणूस : ‘जरंडेश्वर’बाबत आरोप करणाऱ्यांविषयी मला काही बोलायचे नाही!

कारखान्याचे सुरक्षा रक्षक गेटच्या बाहेर मुख्य रस्त्यावर थांबले असून, ते गेटजवळ कोणालाही येऊ दिले जात नाही. दरम्यान, दुपारी एकाच्या सुमारास शासकीय वाहनातून सीआयडीचे अधिकारी कारखाना स्थळावर आले; परंतु त्यांनाही कारखान्यामध्ये प्रवेश मिळू न शकल्याने ते माघारी फिरले.

Related Stories

No stories found.