Jagtap Vs Pachpute : पतींच्या राजकारणासाठी दोघींचा लढा

श्रीगोंदे तालुक्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजविणारे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) सध्या आजारी आहेत.
Pranoti Jagtap Vs Pratibha Pachapute
Pranoti Jagtap Vs Pratibha PachaputeSarkarnama

Jagtap Vs Pachpute : श्रीगोंदे तालुक्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजविणारे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) सध्या आजारी आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांची प्रत्येक गावाशी संपर्क ठेवताना दमछाक होतेय. या दोघांच्या अडचणी लक्षात घेऊन एकाची आमदारकीचा संपर्क कायम ठेवण्यासाठी व दुसऱ्यांना पुन्हा आमदार करण्यासाठी मतदारसंघातील लोकांशी थेट संपर्क त्यांच्या धर्मपत्नी ठेवत आहेत. विशेष म्हणजे दोघीही त्यांचा नेहमीचा थाटमाट बाजूला ठेवून थेट लोकांच्या घरी जात असल्याने, त्यांच्या बाबतीत समाजाचा ओढा वाढतोय.

बबनराव पाचपुते यांनी ४२ वर्षे तालुक्याचे नाव राज्यभर गाजविले. व्यायामात नेत्यांमध्ये सर्वात पुढे असणाऱ्या पाचपुते यांना आजाराने गाठले. याही परिस्थितीत बाहेर कमी फिरत असले तरी त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला असे नाही. मात्र मतदारांशी त्यांचा संपर्क कमी झालाय. ही उणीव डॉ. प्रतिभा पाचपुते या भरून काढत आहेत. त्यांनी आता मतदारसंघात सुरु केलेला संपर्क लक्षणीय आहे. गावागावात जाऊन अडचणी समजूत घेत आहेत. 'दादा' काही काळात तुमच्यात येतील, सध्या तुमच्या अडचणी सांगा मी आहे त्या सोडवायला. ही त्यांची हक्काची भूमिका लोकांना भावत आहे. आमदारांच्या घरातील कोणीतरी आपल्यात येतेय याचा आधार लोकांना वाटतोय हेही खरे आहे.

Pranoti Jagtap Vs Pratibha Pachapute
'काष्टी'त आमदारांचा पराभव : कैलास पाचपुते गटाचा विजय

राहुल जगताप पुन्हा तयारीत आहेत. मात्र त्यांच्याकडे कुकडी कारखाना व जिल्हा सहकारी बँकेची जबाबदारी असल्याने मतदारसंघातील लोकांना हवा तेवढा वेळ देता येत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या पत्नी डॉ. प्रणोती यांनी ही जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत झंझावात सुरु केला. त्या एम.डी. मेडिसीन असल्याने शिक्षणाचा फायदा होतोय. प्रत्येक घरात कुणी तरी आजारी असतेच. त्या गेल्यावर आदराने चौकशी करतात. महिलांच्या पायाला हात लावतानाच, आजारी व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवत त्यांची चौकशी करतात. आजारपणाची फाइल पाहत संबंधित डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून पुढचा उपचार सुचवीत असल्याने डॉ. प्रणोती यांच्याविषयी वेगळे भावनिक नाते तयार होत असल्याचे चर्चेतून दिसतेय.

काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांचे राजकारण आता कारखान्यात सेट झालेय. त्यांनीच अनुराधा नागवडे या विधानसभेच्या उमेदवार असतील असे सुचविले आहे. सगळ्यांना आदर आहेच. नगराध्यक्ष शुभांगी पोटे याही शहरासह तालुक्यात फिरताना दिसतात. तर भाजपाच्या सुवर्णा पाचपुते याही राजकीय भविष्य शोधत संपर्कात आहेत.

Pranoti Jagtap Vs Pratibha Pachapute
बेलवंडीचा गड अण्णासाहेब शेलारांनी राखला : राहुल जगतापांच्या मदतीने नागवडे गटाचा पराभव

लग्नाच्या दिवसापासून तालुक्याच्या राजकारणात 'दादां'च्या खांद्याला खांदा लावून आहे. ३८ वर्षे झालीत मला हे नविन नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणूक बबनरावदादाच लढवतील मी नाही.

- प्रतिभा पाचपुते, अध्यक्ष परिक्रमा संकुल.

'राहुलदादां'ना मदत आणि मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आरोग्यासह नागरी समस्या समजून घेऊन त्याची सोडवणूक कशी करता येईल, हे पाहताना मतदारसंघ समजून घेतीय. आमदारकी मी नव्हे 'दादा'च लढणार आहेत.

- प्रणोती जगताप, संचालक कुकडी कारखाना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com