'पुन्हा ओबीसी आरक्षण आणल्या शिवाय राहणार नाही'

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
'पुन्हा ओबीसी आरक्षण आणल्या शिवाय राहणार नाही'

MLA Nilesh Lanke

Sarkarnama

पारनेर, ता. 18 : पारनेर नगर पंचायतची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. मंगळवारी ( ता. 21 ) मतदान होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP ) आज पारनेर शहरात प्रचार सभेचे आयोजन केले होते. या सभेत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'It will not last without OBC reservation again'

पारनेर नगर पंचायत निवडणुकी निमित्त आज पारनेर शहरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पालकमंत्री मुश्रीफ, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषदेच्या सदस्य राणी लंके, अशोक सावंत, माजी सभापती गंगाराम बेलकर, सुदाम पवार, अॅड राहुल झावरे, संदीप चौधरी, शिवाजी शिंदे, नंदू सोडकर, हसन राजे, पूनम मुंगसे यांच्या सह 13 प्रभागातील उमेदवार उपस्थित होते. विजय डोळ यांनी प्रास्तविक केले.

MLA Nilesh Lanke

हसन मुश्रीफ म्हणाले, नीलेश लंके राज्यातील उमलते नेतृत्त्व...

हसन मुश्रीफ म्हणाले, ओबीसी आरक्षण भाजपनेच घालविले आहे. आम्ही आगामी निवडणुकांपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळवून देऊन पुन्हा ओबीसी आरक्षण आणल्या शिवाय राहणार नाही, असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली.

ते पुढे म्हणाले, आजची गर्दी पाहून सर्व उमेदवार निवडून येतील हे निश्चित आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी शहराला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. 15 दिवसातून एकदा पाणी येते. ही दुर्दैवी स्थिती आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार नीलेश लंके यांच्या हाती सत्ता द्या. मी पारनेर शहराच्या विविध प्रश्न सोडवणुकीसाठी लंके यांच्या पाठिशी सदैव उभा आहे. पारनेर शहराचे विकासाचे प्रश्न सोडविल्या शिवाय विधानसभेची मते मागण्यासाठी मी येणार नाही. शहराचे मूलभूत प्रश्न या पूर्वी सत्ता असलेल्यांना सोडविता आले नाहीत. नगर पंचायत इमारत, सेनापती बापट स्मारक, घरकुल योजना या सारखे प्रश्न सुटले नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी व सरकारच्या योजना घराघरात पोचविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.

MLA Nilesh Lanke

पारनेरमध्ये औटी विरूद्ध लंके निवडणूक : शहर विकास आघाडीनेही लावली ताकद

आमदार लंके यांनी सांगितले की, त्यांना पाच वर्षे सत्ता मिळून सुद्धा पारनेरचा पाणीप्रश्न सोडवता आला नाही. नगर पंचायतसाठी आजही भाड्याची इमारत आहे. क्रीडा संकुलसाठी 22 लाख रुपये मिळणार आहेत. त्यापैकी पाच लाख मिळाले आहेत. ग्रामीण रुग्णालयात शंभर खाटाचे सुसज्ज असे रुग्णालय उभारून तालुक्यातील जनतेला मोफत उच्च दर्जाचे उपचार केले जातील. सेनापती बापट स्मारक शिवाजी महाराज पुतळा जलतरण तलाव घरकुले आदींसाठी मी प्रयत्नशील राहील. काहींनी नात्यागोत्याचे उमेदवार उभे करून निवडणूक लढवीत आहेत निवडणुकी नंतर मात्र एकत्र येतात.

आम्ही शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 73 कोटी, बसस्थानकासाठी 35 कोटी, आंबेडकर भवन 25लाख असे पारनेर शहरासाठी 135 कोटी 65 लाख रुपयांच्या विकासकामाचा आराखडा तयार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहन आमदार लंके यांनी पारनेरच्या मतदारांना केले.

MLA Nilesh Lanke

नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

आमदार लंकेंनी चालविली बैलगाडी

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आनंद म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ व इतर मान्यवरांना बैलगाडी बसवून सन्मानपूर्वक सभामंडपात नेले. त्यावेळी आमदार लंके यांनी काही वेळ स्वत: पालकमंत्री मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष फाळके यांचे सारथ्य केले. आमदार लंके बैलगाडी चालवत असल्याचे पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे फोटो काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.