Raju Shetti : ‘ती’ आमची मोठी चूक ठरली : राजू शेट्टी यांनी दिली कबुली

प्रत्येक सरकारने आणि पक्षाने आमच्या भूमिकांना बगल दिली आहे.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढत होती, तेंव्हा लोक ताकदीने आमच्या सोबत उभे होते. आम्ही महायुती (Mahayuti)-महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) गेलो, ती आमची चूक होती. ती पुन्हा होणार नाही. आता आम्ही स्वतंत्रपणेच लढू, अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मांडली. (It was our mistake to go with Mahayuti-Mahavikas Aghadi : Raju Shetti)

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुतीसोबत जाऊन लढली होती. त्या ठिकाणी शेतकरीहिताचे निर्णय होत नसल्याचे दिसून येताच शेट्टी यांनी २०१९ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांच्यासोबतही राजू शेट्टी यांचे सूत जुळले नाहीत, त्यामुळे सहा-सात महिन्यांपूर्वीच शेट्टी यांनी आघाडीसोबतचे नाते तोडले होते. त्याबाबत शेट्टी यांनी भाष्य केले आहे.

Raju Shetti
Solapur Shivsena News : ‘एक वडा, दोन पाव; निवडणूक आयोग XXX’ : निवडणूक आयोगाविरोधात शिवसैनिक आक्रमक

राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीसोबतचे संबंध एक वर्षापूर्वीच तोडले आहेत. त्यावर पुनर्विचार करावा, अशी गरज आम्हाला काही वाटत नाही. संबंध तोडणे चुकीचे होते, असेही वाटत नाही. कारण, प्रत्येक सरकारने आणि पक्षाने आमच्या भूमिकांना बगल दिली आहे. शेतकरी हिताला बाधा येईल, अशीच धोरणे राबवली आहेत. त्याविरुद्धची लढाई स्वतंत्रपणे सुरु राहील. त्यासाठी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणेच लढणार आहोत. आघाड्यांच्या भानगडीत पडणे ही आमची चूकच होती.

Raju Shetti
Solapur Election : मोहिते-पाटील, शिंदे, काळे, पाटील, बागलांची प्रतिष्ठा पणाला लागणार : डीसीसीसह ४ काखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील छोटे पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी हात पुढे केला, तर विचार करणार का, या प्रश्‍नावर राजू शेट्टी म्हणाले की, मला आता कोणत्याच पक्षावर विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे पुन्हा ती चूक करणार नाही. कारण, आघाड्यांचे अनुभव काही चांगले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com