'माझ्या निवडणूक निकालानंतरच राज्यात सत्तांतराला सुरूवात झाली होती'

Dhananjay Mahadik|BJP|Shivsena : भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे आज आपल्या खासदारकीची शपथ घेणार आहेत.
Dhananjay Mahadik Latest News
Dhananjay Mahadik Latest NewsSarkarnama

Dhananjay Mahadik : राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले होते. आज महाडिक आपल्या खासदारकीची शपथ घेणार आहेत. यापुर्वी महाडिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असून भाजपने दिलेल्या संधीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

आपल्या खासदारकीच्या काळात राज्यातील आणि कोल्हापूरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी निवडून आलो तेंव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) राज्यात होते. मात्र, आज शपथ घेतोय तर आज भाजप आणि शिंदे गटाच सरकार स्थापन झालं आहे. माझ्या निवडणूक निकालानंतरच या सत्तांतराला सुरूवात झाली होती, असं वक्तव्य महाडिकांनी केलं आहे. (Dhananjay Mahadik Latest Marathi News)

Dhananjay Mahadik Latest News
शिवसेना नेते संजय राऊत यांना सोमय्यांचा मोठा दणका; अटक वॉरंट जारी

महाडिक म्हणाले, मी निवडून आल्यावर राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. मात्र शपथ घेण्याआधीच राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खुप आनंदाचा आणि भाग्याचा आहे. माझ्या निवडणूक निकालानंतरच राज्यात सत्तांतराचे चित्र निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तर ही संधी दिल्याबद्दल भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंतप्रधान मोदी आणि पक्ष अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

ते म्हणाले, मी याआधी लोकसभेत चांगले काम केलं आहे. यापुढे राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचा अजेंडा प्रभावीपणे राबवणार आहे. आता राज्यात सत्तांतर झाल्याने आमच्या विचाराचे सरकार राज्यात आले आहे. यामुळे कोल्हापुर आणि महाराष्ट्रासाठी काम करायचे आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असतांना अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यापुढे काम करणार असून केंद्राच्या योजनाही राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या पत्नी आणि पुत्रांनीही आनंद व्यक्त केला आणि महाडीक हे त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात राज्याची विकासकामे करतील अशी, अपेक्षा व्यक्त केली.

Dhananjay Mahadik Latest News
सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नाथाभाऊंचा आवाज पुन्हा घुमणार... आता समोर फडणवीस असणार!

दरम्यान, महाडिक यांना या सहाव्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी दिल्याने राज्यसभेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार हे निवडून येतील, असे बोलले जात होते मात्र, धक्कादाय निकाल लागला आणि महाडिक विजयी झाले होते. या चुरशीच्या लढतीत महाडिक यांनी 41.56 मते मिळवत शिवसेनेच्या पवार यांचा पराभव केला होता.

या निवडणुकीतच महाविकास आघाडीचे मते फुटल्याते स्पष्ट झाले आणि आघाडीत खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच धुसफूस सुरू झाली होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत हीच पुनरावृत्ती झाली आणि एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in