4 वर्षांत महाविकास आघाडी कोसळेल याची शंका होतीच

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी राज्यातील सत्ता परिवर्तनावर भाष्य केले.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama

अहमदनगर - राहुरी येथील पांडुरंग लॉन्स व मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी राज्यातील सत्ता परिवर्तनावर भाष्य करताना, 'चार वर्षांत महाविकास आघाडी सरकार कोसळेल याची शंका होती,' असे सांगितले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. Rahuri NCP News Update

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव होते. या प्रसंगी साई संस्थानेच विश्वस्त सुरेश वाबळे, हर्ष तनपुरे, रोहिदास कर्डिले, संभाजी पालवे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, सीताराम काकडे, अभिषेक भगत, दीपक झोडगे, महेश झोडगे, संतोष पटारे, संतोष धाडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भिटे, भैय्यासाहेब तारडे, किरण कडू, अण्णासाहेब चोथे, प्रभाकर गाडे आदी उपस्थित होते.

Prajakt Tanpure
रोहित पवारांच्या मतदारसंघात बैलगाडे सुसाट : प्राजक्त तनपुरे म्हणाले...

प्राजक्त तनपुरे म्हणाले की, मी राज्यातील घटनाक्रमानंतर पहिल्यांदाच मतदार संघात आलो. पावसाचे वातावरण असतानाही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साहात जमले होते. मंत्रीपद गेल्याने कार्यकर्त्यांत खेद आहे. त्यांच्या भावना मी समजू शकतो. मंत्रीपदाच्या माध्यमातून अडीच वर्षे राज्यभर कारत असताना मतदार संघातही कोट्यावधी रुपयांची विकासकामे आणली आहेत. जरी मी आता विरोधी पक्षातील आमदार असलो तरी मतदारसंघात पुढे अडीच वर्षांतही विकासकामांना खिळ बसणार नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मतदार विकास थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, मतदार संघातील विकासकामे ज्या गतीने सुरू आहेत. त्याच गतीने ती विकासकामे सुरू राहतील. एवढे दिवस सत्ताधारी पक्षाचा मंत्री म्हणून मला विधानसभेत प्रश्नांना केवळ उत्तरेच देण्याची जबाबदारी होती. मात्र आता जनतेचे प्रश्न घेऊन सत्ताधाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार करण्याची संधी मिळेल. याचा मला आनंद आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.

Prajakt Tanpure
संजय बनसोडे म्हणाले, प्राजक्त तनपुरे कॅबिनेट मंत्री होतील...

राहुरी विधानसभा निवडणुकीपूर्वी मी खचलो होतो. आमदारकी मिळेल याची खात्री नव्हती परंतु अर्ज भरताना मला जो प्रतिसाद तोच माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. देवाकडे केवळ आमदार व्हावे अशी प्रार्थना केली होती मात्र देवाने आमदारकी बरोबरच नामदारकीही दिली. सहा खात्यांचे मंत्रीपद संभाळताना शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे व उदय सामंत यांनी मोठे सहकार्य केले. काँग्रेसकडून अपेक्षीत सहकार्य लाभले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

कधीही आमदार अथवा खासदारकीचा अनुभव नसलेले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी कोरोनासारखा कालखंड हाताळला. राज्यातील जनतेचे प्राण वाचविले. पदाचा गर्व न बाळगता ते वारत होते. त्यांना बंडखोरांनी सोडून जाणे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना पवार कुटुंबीयांचे पाठबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी जोमाने काम करणार असे त्यांनी सांगितले.

Prajakt Tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, विरोधकांच्या ईडीला विकास कामांतून उत्तरे देणार...

4 वर्षांत महाविकास आघाडी सरकार कोसळेल अशी मला शंका होती. त्यामुळे मतदार संघातील विकासकामांना गती देत विकासकामे वेळेत पूर्ण करणार होतो मात्र विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. शासन अडीच वर्षांत कोसळल्याने विकासकामांना ब्रेक लागल्याची चर्चा आहे. मात्र कोणीही चिंता करू नये सर्व कामे मार्गी लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मला सत्तेची नाही तर माझ्या मतदार संघातील जनतेची काळजी आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांत मोठे यश मिळवावे लागणार आहे. मंत्रीपदाची भर आपल्याचा या निवडणुकांतून काढायची आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागा. बंडखोरी खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in