माणिक विधाते म्हणाले, ज्येष्ठ व्यक्तीच्या घरावर भ्याड हल्ला करणे चुकीचे...

राष्ट्रवादीचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्यासह नेते व कार्यकर्यांनी तोंडाला पट्टी लावून मूक आंदोलन केले.
NCP Ahmednagar
NCP AhmednagarSarkarnama

अहमदनगर - मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरात घुसून काल ( शुक्रवारी ) काही एसटी कर्मचाऱ्यांनी दगड व चप्पलफेक केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ( NCP ) संतापाची लाट आहे. राज्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. अहमदनगरमधील वाडियापार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्यासह नेते व कार्यकर्यांनी तोंडाला पट्टी लावून मूक आंदोलन केले. ( It is wrong to attack a senior person's home )

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, युवती शहराध्यक्षा अंजली आव्हाड, अशोक बाबर, ओबीसी सेलचे अमित खामकर, वकील सेलचे अ‍ॅड. योगेश नेमाणे, अजय दिघे, फारुक रंगरेज, अब्दुल खोकर, लहू कराळे, गणेश बोरुडे, अनिकेत येमूल, अभिजित ढाकणे, आकाश शहाणे, शशिकांत आठरे, मारुती पवार, दीपक खेडकर आदी सहभागी झाले होते.

NCP Ahmednagar
हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया : म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण..."

या आंदोलनानंतर प्रा. माणिक विधाते यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हे लोकशाहीच्या विरोधात आहे. ते देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे योगदान देत असून, कर्मचारी हिताचे निर्णय घेऊन त्यांनी सर्वात जास्त कामे केलेली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कामगारांसाठी केंद्राने पारीत केलेला कोणताही कायदा महाराष्ट्रात जसाच्यातसा राबविण्याची तरतूद केलेली आहे. कामगारांना त्यांनी नेहमीच न्याय देण्याचे काम केले. मात्र चुकीचे राजकारण करुन एका एसटी कामगार नेत्याच्या चिथावणी वरुन ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे निषेधार्ह बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

NCP Ahmednagar
महापालिका कामगारांच्या मदतीला आमदार संग्राम जगताप धावले : महापालिका आयुक्त, उपायुक्तांनी फिरविली पाठ

ते पुढे म्हणाले की, देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तीच्या घरावर आंदोलनाच्या नावाखाली भ्याड हल्ला करणे चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि लोकशाही विरोधात झालेले हे कृत्य आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांना पेढे वाटून आनंद साजरा करणारे एस.टी. कर्मचारी दोनच दिवसात शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कुटुंबीय घरात असताना आंदोलकांना चिथावनी देऊन नियोजनबद्ध हल्ला करण्यात आला आहे. हे चुकीचे राजकारण खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा यावेळी माणिक विधाते यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com