Thorat Vs Vikhe : बाळासाहेब थोरात म्हणाले, जनताच कोणाचा कारभार कसा ते ठरवेल

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्यावर काल ( रविवारी ) टीका केली होती.
Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar News
Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar NewsSarkarnama

Thorat Vs Vikhe : राज्यातील मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. नवीन मंत्र्यांचे खाते वाटपही झाले आहे. यात ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खाते देण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्यावर काल ( रविवारी ) टीका केली होती. या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेनिमित्त ते अहमदनगर येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, विखे पाटील आता महसूल मंत्री झाले आहेत. त्यांच्या विभागाचे त्यांनी काय करायचे कोणत्या चौकशा लावायच्या हा अधिकार त्यांचा आहे. त्यांनी जनतेच्या हिताच्या गोष्टी कराव्यात. त्यांना आता थोडा काळ मिळाला आहे. त्यात त्यांनी जेवढे चांगले काम करता येईल तेवढे करावे. यात चौकशी असेल तर असू द्या, असा टोला ही त्यांनी लगावला.

Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar News
Dr. Sujay Vikhe Patil : महाराष्ट्राला दाखवून देऊ, दोन महसूल मंत्र्यांत काय फरक आहे...

डॉ. सुजय विखे पाटील यांनी दोन महसूल मंत्र्यांत काय फरक आहे तो कामातून दाखवून देऊ असे सांगितले होते. यावर ते म्हणाले, या वक्तव्याला फार प्रसिद्धी द्यावी असे माझे मत नाही. ते बोलले असतील. शेवटी जनता प्रत्येकाचा कारभार पाहत असते. जनतेने माझा कारभार पाहिला आहे. अनेक वर्षे मी महसूलमंत्रीपदाचा भार संभाळला आहे. यांचाही महसूलमंत्रीपदाचा कारभार जनता पाहिल. त्यानुसार जनताच कोणाचा कारभार कसा ते ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar News
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, खंडणी वसुलीत आघाडी सरकार पटाईत

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधना संदर्भात भावना व्यक्त करताना सांगितले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. समाजातील महत्त्वाचा चळवळीतील कार्यकर्ता गेला आहे. त्याबाबत कोणत्या शंका उपस्थित झाल्या असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी, असे मत त्यांनी मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com