केंद्र सरकारामुळे राज्यातील इंधनावरील कर कपात शक्य नाही

पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hassan Mushrif ) यांनी खरीप आढावा नियोजन बैठक घेतली.
Hassan Mushrif
Hassan Mushrif Sarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hassan Mushrif ) यांनी खरीप आढावा नियोजन बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप व मनसेवर टीका केली. ( It is not possible to reduce the tax on fuel in the state due to the central government )

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभे संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर हसन मुश्रीफ म्हणाले, काही व्यक्ती सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी किती सभा घेऊन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. हे वातावरण बिघडणार नाही. राज्यातील काही ठिकाणी शस्त्र सापडले होते. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे, असे प्रकार घडल्यास गृहविभाग कठोर कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Hassan Mushrif
भाजपच्या घाटगेंना हसन मुश्रीफ समर्थकांचं जशासं तसं उत्तर!

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. केंद्र सरकारच्या जीएसटी उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा सर्वात जास्त आहे. जीएसटीचे 36 हजार कोटी रुपये केंद्राकडून राज्य सरकारला प्राप्त होणे बाकी आहे. चक्री वादळात गुजरातला मदत देण्यात आली मात्र महाराष्ट्राला मदत देण्यात आली नाही. अशा परिस्थितीत राज्याला उत्पन्नासाठी इंधनावर कर लावणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात इंधन कर कपात होणे शक्य नाही. राज्य सरकार चालले पाहिजे.

Hassan Mushrif
Video: आगामी निवडणूक आरक्षणासह; हसन मुश्रीफ

मागील दोन वर्षांपासून जास्त पाऊस झाल्याने या वर्षी उसाची विक्रमी लागवड झाली. ज्या साखर कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणावा लागत आहे, अशा साखर कारखान्यांना अनुदान देण्याचे धोरण राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com