एच. के. पाटील म्हणाले, भाजपच्या ‘भारत तोडो’ला काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
H. K. Patil
H. K. PatilSarkarnama

अहमदनगर - शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ( It has been proved that only the ideology of equality of the Congress can take the country forward )

पाटील म्हणाले की, केंद्रातील भाजपचे सरकार हे लोकशाही विरोधी, जनविरोधी आहे. हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. मात्र मागील 8 वर्षांत देशातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात आहे. या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या, असे आवाहन एच. के. पाटील यांनी केले आहे.

पटोलेंना केंद्र सरकार म्हणायचं होतं, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला : एच. के. पाटील

या शिबिरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना एच. के. पाटील मार्गदर्शन करत होते. या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, ‘एक व्यक्ती, एक पद’ या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरु झालेली आहे. याबरोबरच राजकीय पातळीवरील आव्हानांचा सामनाही आपल्याला करावयाचा आहे. हा देश काँग्रेसच्या त्यागाने, बलिदानाने उभा राहिलेला आहे परंतु आज देशच संकटात सापडलेला आहे. जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट येते तेव्हा तेव्हा सह्याद्री मदतीला धावतो हा इतिहास असून आज देशाला महाराष्ट्राची गरज आहे. आज पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.

H. K. Patil
खर्गे यांना हटवले; एच. के. पाटील नवे प्रभारी : कॉंग्रेस कार्यकारिणीत मोठे बदल 

सकाळच्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन झाले व त्यानंतर प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. दुपारी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे दुसऱ्या दिवशी सादरीकरण होईल. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com