काँग्रेसची समतेची विचारधाराच देशाला पुढे नेऊ शकते हे सिद्ध झालेय

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी काँग्रेसची विचारधारा सांगितली.
काँग्रेसची समतेची विचारधाराच देशाला पुढे नेऊ शकते हे सिद्ध झालेय
Balasaheb ThoratSarkarnama

अहमदनगर - शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर सुरू आहे. या शिबिराचे स्वागताध्यक्षपद राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांना देण्यात आले आहे. या शिबिरात बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची समतेची विचारधाराच देशाला पुढे नेऊ शकते. काँग्रेसवर श्रद्धा ठेवा. हाही काळ जाईल त्यामुळे सबुरी ठेवा, असा सल्लाही त्यांनी उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांना दिला. ( It has been proved that only the ideology of Congress can take the country forward )

या शिबिराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी एस.के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, बंटी पाटील, प्रणिती शिंदे, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम आदी उपस्थित होते.

Balasaheb Thorat
काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवाराबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले....

बाळासाहेब थोरात म्हणाले, मागील महिन्यात उद्यपूरला काँग्रेसचे राष्ट्रीय शिबिर झाले. या शिबिरात काही ठराव झाले. या ठरावावर देशभरातील सर्व राज्यांत दोन दिवसीय शिबिर घेऊन चर्चा होत आहे. त्यात पुढील 100 दिवसांची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली आहे, असे त्यांने स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, समतेच्या पायावर काँग्रेस पक्ष उभा आहे. हा संत व समाजसुधारकांचा विचार आहे. काँग्रेसची ही समतेची विचारधाराच देशाला पुढे नेऊ शकते. हे सिद्ध झाले आहे. कदाचित काँग्रेसला व आपल्या विचारधारेला सध्या कठीण दिवस असतील. तेच विचार कायम राहतील कारण, ही विचारधाराच शाश्वत आहे. ती विचारधारा जपण्याची व वाढविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू...

श्रद्धा व सबुरी हा साईबाबांचा संदेश आहे. श्रद्धा, सबुरी ठेवा. मीही ठेवली. मध्यंतरी अशी वेळ आली होती की, काय करावे हे कळत नव्हते. त्यावेळी आम्ही डळमळीत झालो नाही. श्रद्धा काँग्रेसवर ठेवा आणि सबुरीने काम करत रहा. काँग्रेसने म्हणूनच मला खूप काही दिले, संभाळून घेतले, संधी दिली. साईबाबांचा श्रद्धा, सबुरीचा संदेश सर्वांनी जपावा, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसला निश्चितच चांगले दिवस येणार आहेत. त्यासाठी तयारीला लागा. आपोआप संधी येणार नाही. त्यासाठी प्रयत्न करा. पुन्हा एकदा काँग्रेस सरकार आणण्याचा नारा सोनिया गांधी यांनी उदयपूरला दिला होता. तो नारा खरे करून दाखविण्याचे काम करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in