धुडगुस घालायला अक्कल लागत नाही... अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

अजित पवार Ajit Pawar म्हणाले, राज्यात State काही लोक धार्मिक तेढ Religious rift निर्माण करत आहेत. त्याला सातारकरांनी satarkar बळी पडू नये.
Raj Thackeray, Ajit Pawar
Raj Thackeray, Ajit Pawarsarkarnama

सातारा : ज्यांनी साधी दूध सोसायटी काढली नाही. एक खरबूज, टरबूज यांची सोसायटीदेखील नाही. संस्था चालवायला डोकं लागतं. धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही" असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला. दरम्यान, किसन वीर कारखान्याबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासकिय विश्रामगृहात अजित पवारांशी रात्री उशीरा पत्रकारांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने या जिल्ह्यात जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करणार आहोत. राज्याला दिशा देण्याचं काम साताऱ्याने केलं आहे. साखर कारखाना चालवणं हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही.

Raj Thackeray, Ajit Pawar
अयोध्येत राज ठाकरे येवू शकतात.... पण तेथून परत येणे अवघड

किसन वीर कारखान्यात ५२ हजार सभासद आहेत. याबाबत लवकरच आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. जे पोपटासारखे बोलतात त्यांनी कारखाना चालवून दाखवावा. राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळून त्यांनी सडेतोड टीका केली. श्री. पवार म्हणाले, ''राज्यात काही लोक धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. त्याला सातारकरांनी बळी पडू नये. काही लोक पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे उगवतात. कधी टोल बंद करा म्हणतात, कधी यूपी-बिहारच्या लोकांना हाकला म्हणतात, आता भोंगे बंद करा म्हणत आहेत. पण, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दिसला नाही का? कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे.''

Raj Thackeray, Ajit Pawar
तर आमदार मकरंद पाटलांच्या डोक्यावरील केसही राहणार नाहीत... अजित पवार

समाजात विष कालवणाऱ्या माणसाने समाजासाठी चांगले काम काय केलं आहे, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ज्यांनी साधी दूध सोसायटी काढली नाही. एक खरबूज, टरबूज यांची सोसायटीदेखील नाही. संस्था चालवायला डोकं लागतं. धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही" असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

Raj Thackeray, Ajit Pawar
उर्जा विभागाची तत्परता! थकीत वीजबिलाच्या यादीतून अजित पवारांचे नाव २ तासात हटवलं

शरद पवारांवर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "राज ठाकरे यांचं जेवढं वय नाही तेवढं शरद पवारांनी राजकारण केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी भोंगे बंद केल्याचं कौतुक राज ठाकरे करत आहेत. मात्र, त्यांनी फक्त मशिदींवरचे नव्हे तर मंदिरांवरचे भोंगेही उतरवले आहेत हे लक्षात घ्यावे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com