शिवसेनेला श्रेय न मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानेच केला `गेम`

इस्लामपूर (Islampur Municipal Corporation) पालिका निवडणूक जवळ येत आहे, या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्तासंघर्ष वाढत चालला आहे.
शिवसेनेला श्रेय न मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानेच केला `गेम`
Islampur Municipal Corporationsarkarnama

इस्लामपूर : इस्लामपूर (Islampur Municipal Corporation) पालिका निवडणूक जवळ येत आहे, या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्तासंघर्ष वाढत चालला आहे. सत्ताधारी विकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने पाठपुरावा करून विकासकामांसाठी ११ कोटी रुपये मंजूर करुन आणले. त्यावरुन राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेत (Shiv Sena ncp) राजकारण रंगले आहे

जो अकरा कोटी रुपयांचा निधी मिळाला म्हणून मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह अन्य मंत्री व नेत्यांचे डिजिटल शहरभर झळकले, त्याच ११ कोटी रुपयांच्या स्थगितीचा धक्कादायक आदेश राज्य सरकारने पालिकेला दिला आहे. मागे मोठी 'राजकीय कुरघोडी' झाल्याची चर्चा आहे. याच निधीवरून विशेष सभेला राष्ट्रवादी काँग्रेसने सलग तीन वेळा विशेष सभेला दांडी मारल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले होते. याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या ११ कोटींच्या निधीला स्थगितीचा नवा अध्यादेश नगरविकास विभागाने काढला आहे. त्यामुळे यामागे राजकीय खेळी असल्याची विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही गेम केली असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी विकास आघाडी-शिवसेनेचा सत्ताकाळ संपत आला असताना शहरातील रस्ते व गटर कामांच्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करुन आणला होता.

Islampur Municipal Corporation
पुणे विद्यापीठात लवकरच सावित्रीबाई फुलेंचा पुतळा : भुजबळ

१५ दिवसांपूर्वी म्हणजे २ नोव्हेंबरला नगरविकास विभागाने काढला होता. तातडीची विशेष सभा बोलवून ठराव करून कामांना सुरवात करण्याचे ध्येय असलेल्या विकास आघाडी-शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसने धक्का दिला. तीनही सभांना कोरम पूर्ण होऊ नये यासाठी सरळसरळ दांडी मारली. जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याचा मार्ग आघाडीने स्वीकारला. मात्र आता त्यालाही पूर्णविराम मिळाला आहे. या कामांचा ठराव मंजूर करण्यापूर्वीच शिवसेनेने शहरात सगळीकडे डिजिटल झळकवले. मात्र अवघ्या दोन आठवड्यात या आनंदावर विरजण पडले आहे. यानंतर आता विकास आघाडी-शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.