हनुमान चालिसा म्हणून बजरंगबली आपल्याला भाकर खाऊ घालणार आहे का?

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी भोंगे व हनुमान चालिसावरून सुरू असलेल्या राजकारणावर टीकेची तोफ डागली.
Dhananjay Munde
Dhananjay Munde sarkarnama

अहमदनगर - कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या प्रयत्नाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विशेष मोहिमेतील लाभार्थींना लाभ मंजुरी आदेश वाटप कार्यक्रम आज जामखेडमध्ये झाला. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी भोंगे व हनुमान चालिसावरून सुरू असलेल्या राजकारणावर टीकेची तोफ डागली. ( Is Bajrangbali going to feed you bread as Hanuman Chalisa? )

धनंजय मुंडे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत माणसे मरण्या अगोदर त्यांची माणूसकी मेली होती. आमच्या सारखे नव्याने झालेले आमदार, मंत्री जनतेसाठी काम करत होते. मी अनुभवाचेच सांगतो. पहिल्या लाटेत मलाही कोरोना झाला. रात्री तपासणी झाली. रात्री उशिरा रिपोर्ट आला, कळलं मी पॉझिटिव्ह आलो. त्रास व्हायला लागला. मी माझ्या ड्रायव्हर व जवळच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीला फोन केला. दवाखान्यात जाण्यासाठी वाहन आणायला सांगितले. माणुसकी मेल्याचे जिवंत उदाहरण माझे सांगतो. माझे दोन्ही माणसांनी येण्यास नकार दिला.

Dhananjay Munde
मला धनंजय आणि पंकजा मुंडे दोघेही सारखेच...

ते पुढे म्हणाले, दुसऱ्या लाटेत माणसं गेली. माणसं जात असताना माणुसकी जिवंत असलेली दिली. जवळचे मित्र, नातेवाईक रुग्णाला हाताला धरून रुग्णालयात घेऊन जाताना दिसले. मागील वर्षी याच महिन्यात ऑक्सिजन व बेडसाठी आटापिटा सुरू होता. आता वेगळा घोर लागला आहे. कोणाला भोंगे लावणं, कुणाला उठवणं, कोणी हनुमान चालिसा वाचेल. कोण घरात वाचणार की कोणाच्या दारात वाचणार. कुणाला वाचता येत असेल नसेल माहिती नाही मात्र वातावरण एवढं तापवलयं की डोक्यातून कोविडचं खुळ गेलं.

एक वर्षांच्या आत कोविडच खुळ उतरलं आणि धर्मांधतेचे खुळ डोक्यात घुसलं. याच्या सारखं दुसरं दुर्दैव नाही. कोणाला भोंगा लावायचाय त्यांनी ठरवावं. कुणाला हनुमान चालिसा घरात, बजरंगबली समोर, माणसा समोर की दैत्या समोर वाचायची हे ठरवावं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दैत्याचे मंदिर आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Dhananjay Munde
धनंजय मुंडे म्हणाले, मी भगवानगडाचा निस्सीम भक्त...

कोणाला कुठे वाचायचे ते वाचा. आपल्या डोळ्या देखतचे गेल्या वर्षी पटापट मरून गेले. ते एका वर्षात आपण विसरलो आणि हे खुळ डोक्यात घेऊन बसलो. कुठला भोंगा खालीवर करून आपली भूक भागणार आहे का? हनुमान चालिसा म्हणून बजरंगबली आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ भाकर खाऊ घालणार आहे का? इंधन दरवाढ झाल्याचे अजूनही कळेना. आम्ही एकीकडे जनतेला कष्ट पडू नये म्हणून प्रयत्न करतोय तर दुसरीकडे ते जातीपाती धर्माचे राजकारण करत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात धर्माचे जातीपातीचे राजकारण जनता सहन करणार नाही, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Dhananjay Munde
Video: राज ठाकरे हे तर अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची खोचक टीका

ऊसतोडणी मजुरांच्या समस्येची मला जाणिव

माझ्या वडिलांनी ऊसतोड केली होती. त्यामुळे ऊसतोड मजुराच्या समस्यांची मला जाणिव आहे. मागील पाच वर्षांत ऊसतोड मजुरांचे राजकारण झालं गोपिनाथ मुंडेंच्या नावाचही राजकारण झालं. मला ऊसतोड मजुरांच्या कष्टाची जाणिव आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ स्थापन केलं, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com