अंतर्गत गटबाजीचा शिवसेनेला फटका : सतीश भांगरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अकोले तालुक्यातील शिवसेनेत ( Shivsena ) गटबाजी सुरू आहे.
Satish Bhangre
Satish BhangreSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पक्षांतराची वारे वाहू लागले आहेत. यातच अकोले तालुक्यातील शिवसेनेत ( Shivsena ) गटबाजी सुरू आहे. काँग्रेस अकोल्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे अकोल्यातील नेते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. ( Internal factionalism hits Shiv Sena: Satish Bhangre joins Congress )

शिवसेनेचे नेते सतीश भांगरे यांनी नुकताच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत असले तरी अकोले तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यामध्ये मोठी गटबाजी आहे. शिवसेना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वाद असल्याने आपण शिवसेना पक्ष सोडला आहे, असे स्पष्टीकरण सतीश भांगरे यांनी दिले.

Satish Bhangre
अकोलेतील राजकीय विरोधक भांगरे-पिचड आले एकत्र

2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविणारे सतीश भांगरे यांनी नंतर महाविकासआघाडी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2014 ते 2022 या कालावधीत शिवसेनेमध्ये काम केले. मात्र शिवसेनेत गटबाजी उफाळून येत असून वाद मोठ्याप्रमाणात असल्याने सतीश भांगरे यांनी राज्याचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

Satish Bhangre
अशोक भांगरे म्हणाले, स्वस्त धान्य काळा बाजार प्रकरणातील सूत्रधार शोधा...

अकोले तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढत असून पूर्वी पासून अकोले तालुक्यातील आदिवासी भागात काँग्रेस पक्षाला मानणारे नागरिक आहेत. काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे सांगत काँग्रेस पक्षच अकोले तालुक्यातील प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास सतीश भांगरे यांनी व्यक्त केला. आपण काँग्रेस पक्षाचे वतीने जिल्हा परिषद लढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील तो आपल्या ला मान्य राहीन असेही त्यांनी सांगितले.

Satish Bhangre
सीताराम भांगरे बनले रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील रामदूत

शिवसेनेचे अजून काही नेते काँग्रेसच्या संपर्कात...

तालुक्यातील अजून काही नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यांनी मुंबई येथे जाऊन वरिष्ठ नेत्यांशी बोलणी केली आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पदे मिळविण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा अकोले तालुक्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com