Medha : शिवेंद्रसिंहराजेंकडून मेढ्यातील रहिवाशांवर अन्याय : अमित कदम

Shivendraraje Bhosale सातारा- जावली विधानसभेचे नेतृत्व करत असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नेहमी पाठपुराव्याचे यश मिळाल्याचे श्रेय घेत असतात.
Shivendraraje Bhosale, Amit Kadam
Shivendraraje Bhosale, Amit Kadamsarkarnama

Medha News : जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणुन ओळख असलेल्या मेढा नगरपंचायतीच्या पहिल्या चतुर्थकर आकारणी अन्यायकारक जिझिया कर रद्द करण्याचा शब्द अद्याप आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी Shivendraraje Bhosale पाळला नाही. मात्र, सातारची चतुर्थ कर आकारणी रद्द करण्याकरीता नगरविकास विभागाकडे सहा महिने पाठपुरावा करुन कर आकारणीत पत्र मिळवणार्‍या आमदारांचा मेढ्यातील रहिवाशांवर अन्याय का, असा संवेदनशील प्रश्न मेढ्याचे भूमीपुत्र अमित कदम Amit Kadam यांनी उपस्थित केला आहे.

सातारा- जावली विधानसभेचे नेतृत्व करत असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले नेहमी पाठपुराव्याचे यश मिळाल्याचे श्रेय घेत असतात. मात्र, मेढा नगरपंचायतीच्या जुलमी व अन्यायकारक चतुर्थ कर आकारणी विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले. तेव्हा ग्रामास्थांना कर आकारणी तुर्तास थांबवली, असल्याचे तोंडी सांगितले. मात्र, अद्याप नगरविकास विभागाकडून कोणतीच स्थगितीची कारवाई झाली नाही, असे अमित कदम म्हटले आहे.

मेढा नगरीच्या प्रारुप विकास आराखड्याला देखील स्थगिती देण्याचा जाहीर बैठकीत आपण मेढावाशियांना शब्द दिला होता. तो अद्यापही पाळला गेला नाही. आपण सातारा जावली विधानसभेचे नेतृत्व करता. मग जो न्याय सातारला तो न्याय मेढ्याला आपण का देत नाही. आपल्या विचाराचे बहुमत मेढा नगरपंचायतीत असताना आपण चतुर्थ कर आकारणी का रद्द करु शकला नाही. मेढ्याच्या जनतेच्या माथी जिझिया कर कोणी लादला. या सर्व प्रश्नाची उत्तरे आता लोकांना मिळाली आहेत.

Shivendraraje Bhosale, Amit Kadam
Satara : चार पाच डाकूंकडूनच उद्धव ठाकरेंना चुकीचे फिडींग : गुलाबराव पाटील यांची टीका

लोकप्रतिनीधी म्हणुन फक्त शेलक्या कांमाच श्रेय घ्यायच अन् जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात हात वर करायचा हा आपला मानदंड राहिला आहे. मतदार संघातील सगळ्या नागरीकांना समान न्याय देण्याच्या भुमीकेला आपण छेद दिला आहे. आपल्याच मतदार संघातील मेढा नगरपंचायतीला सापत्न वागणूक का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. करवाढीच्या संदर्भात मेढा ग्रामस्थांवतीने मेढा विकास आघाडी , मेढा शेतकरी बचाव संघ यांनी २७/७/ २०२२ तसेच ७/११/२०२२ रोजी मुख्याधिकाऱ्यांना व संबधीत सर्वच प्रशासकिय अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. नागरीकांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अमित कदम यांनी दिली आहे.

Shivendraraje Bhosale, Amit Kadam
Satara Palika : घरपट्टी आकारणीस स्‍थगिती; शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com