इंदोरीकर महाराज पडले आजारी : या तारखेपर्यंतची सर्व कीर्तने रद्द

इंदोरीकर महाराज आजारी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने ते आठवडाभर विश्रांती करणार आहेत.
इंदोरीकर महाराज पडले आजारी : या तारखेपर्यंतची सर्व कीर्तने रद्द
Nivrutti maharaj Indurikar NewsSarkarnama

अहमदनगर - कीर्तनात विनोदातून समाजप्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) हे त्यांच्या वैशिष्यपूर्ण शैलीने राज्यभर प्रसिद्ध आहेत. त्यांना राज्यातील विविध भागातून कीर्तनासाठी बोलावले जाते. मात्र हे इंदोरीकर महाराज आजारी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने ते आठवडाभर विश्रांती करणार आहेत. त्यामुळे 30 मे पर्यंतची त्यांची सर्व कीर्तने रद्द करण्यात आली आहेत. ( Indorikar Maharaj fell ill: All kirtans canceled till this date )

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेले इंदोरी हे निवृत्त महाराजांचे गाव. त्यांच्या गावाच्या नावावरून त्यांनी नावा पुढे इंदोरीकर असे अभिमानाने लिहितात. त्यांनी स्वतःच्या आजारपणा विषयीची माहिती प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली आहे. (Nivrutti maharaj Indurikar News)

Nivrutti maharaj Indurikar News
हरिपाठाची एक, टोपेंच्या दोन कोविड लस घ्या ; इंदोरीकर महाराजांकडून जनजागृती

या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, प्रकृती अस्वस्थ्यामुळे डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे 23 ते 30 मे या कालावधीतील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. इच्छा असुनही कार्यक्रमास येऊ शकत नाही. त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगीर आहोत. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम होतील, असे इंदोरीकर महाराज यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in