Satara News : केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीकडे अधिकाऱ्यांचे दूर्लक्ष; मंत्री भागवतांचा कारवाईचा इशारा

Bhagwat Karad जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतला.
Minister Bhagwat Karad
Minister Bhagwat Karadsarkarnama

Bhagawat Karad News : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आवास योजना, जल जीवन मिशन या योजनांची ज्या ताकतीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, त्यापद्धतीने अधिकारी करत नाहीत. यावरुन आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड Bhagawat Karad यांच्यासोबतच्या आढावा बैठकीत आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore व महेश शिंदे Mahesh shinde यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर मंत्री कराड यांनी ज्या अधिकाऱ्यांमुळे योजनांची अंमलबजावणी होत नाही, अशा अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असा दम भरला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा श्री. कराड यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत किसान सन्मान योजनेची केवायसी कोणी करायची याबाबत कृषी विभाग व महसूल विभागात ताळमेळ नसल्याचा मुद्दा आमदार गोरे यांनी मांडला. त्यामुळे या योजनेतील ७० हजार लाभार्थी वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना जागेचा प्रश्न सोडविण्यात अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा मुद्दा आमदार महेश शिंदे यांनी मांडला.

Minister Bhagwat Karad
Karad APMC News : कराडला कॉंग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी-भाजप युती; पाटील, चव्हाण आमनेसामने

तसेच जलजीवन मिशन प्रभावीपणे राबवले जात नाही. त्यामुळे अनेक गावे या योजनेपासून दूरच असल्याचाही मुद्दा मांडण्यात आला. यावरुन मंत्री भागवत कराड यांनी शासकीय योजना संवेदनशीलतेने राबवाव्यात, असे सांगून श्री. कराड म्हणाले, ‘‘घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना जमीन नसेल तर जमीन देण्यासाठी महसूल विभागाने कार्यवाही करावी. जे अधिकारी योजनांच्या अमंलबजावणीकडे दूर्लक्ष करतील, त्यांना जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असा दम भरला.

Minister Bhagwat Karad
Narendra Modi Kerala Tour : धमकीच्या पत्रानंतरही पंतप्रधान मोदी थेट रस्त्यावर उतरले; पहा फोटो

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com