अपक्ष उमेदवाराचा NCPत प्रवेश : पारनेरच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे

पारनेर नगरपंचायत जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांनी प्रयत्न सुरू आहेत.
Independent candidate's entry into NCP

Independent candidate's entry into NCP

Sarkarnama

पारनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सुरू केला आहे. त्यामुळे पारनेरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. पारनेर नगरपंचायत जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. Independent candidate's entry into NCP: Signs of changing political equations in Parner's election

पारनेर नगरपंचायतीसाठी 17 पैकी 13 प्रभागात निवडणूक होत आहे. चार प्रभागात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने त्या प्रभागांतील निवडणूक तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. 13 प्रभागांपैकी पाच व नऊ या दोन प्रभागात दुरंगी तर इतरत्र तिरंगी तर काही प्रभागांत बहुरंगी लढत होत आहे.

<div class="paragraphs"><p>Independent candidate's entry into NCP</p></div>
नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

प्रभाग पाचमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाने आपला उमेद्वार दिला नाही. मात्र मंगळवारी (ता.14) रात्री प्रभाग पाच मधील अपक्ष उमेदवार नितीन अडसूळ यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने या प्रभागासह इतर प्रभागांतील निवडणुकीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रभाग पाचमध्ये अपक्ष उमेद्वार नितीन अडसूळ यांच्या विरोधात शहरविकास अघाडीचे उमेद्वार चंद्रकांत चेडे यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. कारण या प्रभागात शिवसेना व राषट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपला उमेद्वार उभा केला नाही. आता अडसूळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना कोणाला मदत करणार व कोणाला पाठिंबा देणार यावर पारनेर शहरात राजकीय चर्चा रंगली आहे.

<div class="paragraphs"><p>Independent candidate's entry into NCP</p></div>
पारनेरमध्ये औटी विरूद्ध लंके निवडणूक : शहर विकास आघाडीनेही लावली ताकद

त्याच प्रमाणे प्रभाग नऊमध्ये सुद्धा माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी व माजी सभापती जयश्री औटी या निवडणूक लढवत आहेत. या ही ठिकाणी शहर विकास अघाडीने उमेद्वार दिला नाही, तर राष्ट्रावादी काँग्रेस पक्षानेही एक तरूण व नवखा उमेद्वार दिला आहे. त्यामुळे औटी यांना ही निवडणूक सोपी करण्यासाठी तर हा निर्णय अपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला नाही, ना अशीही शहरात सध्या चर्चा सुरू आहे.

तसेच शहरविकास अघाडीने प्रभाग नऊमध्ये औटी यांच्या विरोधात उमेद्वार दिला नसल्याने शिवसेना चेडे यांना पाठिंबा देणार का अशीही चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. या दोन प्रभागांतील अशा विचित्र लढतीमुळे कोण कोणाशी हातमिळवणी करणार व निवडणुकीनंतर कोणती राजकीय समीकरणे जन्माला येणार यावर सध्या पारनेरमधील राजकीय धुरंधरांचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com