Nashik Legislative Council Elections : नाशिक पदवीधरचा सस्पेन्स संपला; सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार

Satyajeet Tambe Latest News: महाविकास आघाडीचे ठरले.
Satyajit Tambe News
Satyajit Tambe NewsSarkarnama

Nashik Legislative Graduate Constituency Election : नाशिक पदवीधरसाठी काँग्रेस पक्षातर्फे मी होतो. पदवीधरांना विशेष अधिकार दिले आहेत. मला १३ वर्ष काम करायला मिळाले. शिक्षण क्षेत्रामध्ये खूप प्रश्न आहेत. नवीन विषय या क्षेत्रात येत आहेत. तरुण नेतृत्व देण्याची गरज आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांना संधी दिलेली आहे.

सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. भाजपची (BJP) कोणतीही ऑफर नव्हती. काँग्रेस (Congress) पक्षाची इच्छा होती. मात्र, एबी फॉम डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने अर्ज आला होता. त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरला आहे.

Satyajit Tambe News
Amol Kolhe : ''जे वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत, त्यांनी..''; खासदार कोल्हेंनी नितेश राणेंना सुनावलं

उमेदवारी जाहीर होताना सुधीर तांबे यांच्या नावे एबी फॉम आला होता. त्यामुळे अपक्ष अर्ज भरला. मी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहे. भाजप, शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे तांबे यांना सांगितले.

Satyajit Tambe News
Mahavikas Aghadiकडून चौथा उमेदवार रिंगणात, इटकेलवार म्हणतात आता माघार नाही !

सत्यजीत तांबे म्हणाले, मी काँग्रेसचाच आहे. मात्र, मला सगळ्याच पक्षांनी पाठिंबा द्यावा. त्यासाठी मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com