Satara News : नद्यांचे प्रदुषण वाढले; संवर्धनासाठी कोणते उपाय केले... श्रीनिवास पाटलांचा लोकसभेत आवाज

River Pollution लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी प्रदूषण संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केला.
MP Shrinivas Patil
MP Shrinivas Patilsarkarnama

Shrinivas Patil News : जल प्रदुषण टाळण्यासाठी आवश्यक पाऊले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी कोणते उपाय केले आहेत, असा प्रश्न उपस्थित करत नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील Shrinivas Patil यांनी लोकसभेत loksabha केली.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध मुद्द्यांवरती आवाज उठवला. त्यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी प्रदूषण संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केला. नदीचे पाणी प्रदूषण समस्या सोडवण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला.

खासदार पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी उत्तर पाठवले आहे. त्यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ राष्ट्रीय पाणी गुणवत्ता निरीक्षण कार्यक्रमातंर्गत चार हजार ४८४ मॉनिटरिंग स्टेशनच्या नेटवर्कद्वारे देशात वेळोवेळी नद्या आणि इतर जलस्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण वेगवेगळ्या राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा प्रदूषण नियंत्रण समितीच्या सहयोगाने करत असते.

MP Shrinivas Patil
Satara : भ्रष्ट कोण आणि क्रियानिष्ट कोण, लोकांना कळू देत : उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला

नोव्हेंबर 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या नवीनतम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, जैविक प्रदूषणाचे सूचक बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) पातळीच्या संदर्भात निरीक्षण परिणामांवर आधारित २७९ नद्यांवर ३११ प्रदूषित नदीचे पट्टे ओळखण्यात आले. सातारा जिल्ह्यात कृष्णा, वेण्णा, कोयना, नीरा आणि ५ नद्यांवरील १२ ठिकाणी निरिक्षण केले होते.

MP Shrinivas Patil
Karad : कराड, मलकापूरला शुद्ध पाण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा विधानसभेत आवाज

या निरिक्षण करण्यात आलेल्या १२ पैकी ११ ठिकाणी ३.० मिलीग्राम/लिटर पेक्षा जास्त बीओडी पातळीच्या वर प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे. नद्यांची स्वच्छता, पुनरुत्थान ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पाणी हा राज्यांचा विषय असल्याने त्याची जबाबदारी राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक संस्था आणि उद्योगांची आहे.

MP Shrinivas Patil
Karad : रेल्वेमंत्री प्रभूंच्या हस्ते भूमिपूजन; तरीही कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळला कसा...

सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी जमिनीत अथवा जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी विहित नियमांनुसार सोडावे किंवा त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com