अभय आव्हाड यांचा भाजपतच सवता सुभा

भाजपकडून ( BJP ) आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे पक्ष संघटन मजबूत करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
अभय आव्हाड यांचा भाजपतच सवता सुभा

Abhay Awhad, a supporter of Sujay Vikhe

Sarkarnama

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( अहमदनगर ) : पाथर्डी नगर पालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे पाथर्डी शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपकडून ( BJP ) आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे पक्ष संघटन मजबूत करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. अशातच पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनीही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आव्हाड हे विखे समर्थक आहेत. त्यामुळे भाजपमध्येच दुफळी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Increased difficulties of Pratap Dhakne from Sujay Vikhe's supporters

आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांच्या पाठोपाठ आता आगामी पालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी लोकसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. शहरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेणे त्यांनी सुरु केल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Abhay Awhad, a supporter of Sujay Vikhe</p></div>
राजेंद्र फाळके म्हणाले, प्रताप ढाकणे षटकार मारणार...

सध्या पालिकेतील सत्ताधारी आघाडीची मुदत संपली असून कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होतील असे गृहीत धरत या पूर्वी ढाकणे व त्यांच्या पाठोपाठ राजळे यांनी शहरात लोकसंपर्क मोहीम हाती घेतली होती तर आव्हाड यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून आपल्या प्रभागात विकास कामांना सुरवात करत लोकसंपर्क अभियान सुरु केले आहे.

<div class="paragraphs"><p>Abhay Awhad, a supporter of Sujay Vikhe</p></div>
मोनिका राजळे म्हणाल्या, विरोधकांच्या टिकेची पर्वा नाही...

आव्हाड हे भाजपमध्ये असले तरीही ते विखे यांचे समर्थक म्हणून कार्यरत आहे. शहरात त्यांचा मोठा लोकसंपर्क असल्याने त्यांच्या भूमिकेला महत्व निर्माण झाले आहे. सध्या त्यांची राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी सलगी चांगलीच वाढली असल्याने ते हातात घड्याळ बांधणार असे बोलले जात असले तरीही त्यांनी आपण आपली भूमिका नव्या वर्षात जाहीर करू, असे सांगितल्याने नेमके काय असा प्रश्न पालिका वर्तुळातून विचारला जात आहे. ते भाजप मध्येच राहणार की राष्ट्रवादीत जाणार की स्वतंत्र आघाडी उभारणार या विषयी सध्या तरी उत्कंठा निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.