Jaykumar Gore : छातीतील वेदना वाढल्या; जयकुमार गोरे पुन्हा रूबी हॉलला

Phaltan फलटण येथे गेल्या १४ दिवसांपूर्वी भीषण अपघातात आमदार गोरे जखमी झाले होते.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama

Maan News : गेल्या दोन दिवसात दगदग झाल्याने आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आमदार गोरे यांना शुक्रवारी रात्री पुन्हा पुण्याला Pune हलविण्यात आले आहे.

फलटण येथे गेल्या १४ दिवसांपूर्वी भीषण अपघातात आमदार गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती. रुबी हॉल क्लिनिकमध्ये बारा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. काल गुरुवारी त्यांना एअर ॲंब्यूलन्सने बोराटवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते.

काल आणि आज प्रवास तसेच खूप दगदग झाल्याने त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या.रुबी हॉल क्लिनिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थानिक डॉक्टरांनी आमदार गोरेंवर उपचार केले. त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशीरा पुण्याला हलविण्यात आले.

MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore Accident : जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात नेमका कसा झाला?

दोन दिवसात आमदार गोरेंना पुरेशी विश्रांती मिळाली नाही. हालचाल वाढल्याने त्यांच्या छाती आणि पायाला वेदना होवू लागल्या आहेत.पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, असे आवाहन सौ. सोनिया गोरे यांनी केले आहे.

MLA Jaykumar Gore
Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in