'आयकर'च्या कारवाईवर गृहराज्यमंत्र्यांना संशय; कारखानदार चौकशीला तयार...

केंद्राच्या सत्ताधारी यंत्रणेचा वापर करुन महाविकास आघाडीतील नेत्यांवर खोटे आरोप केले जात आहेत.
'आयकर'च्या कारवाईवर गृहराज्यमंत्र्यांना संशय; कारखानदार चौकशीला तयार...
Kirit Somayya, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : आयकर विभागाने (Income Tax Department) आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापेमारी केली. यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भूमिका जाहीर करताना जाणीवपूर्वक भाजपचा एक माजी खासदार येतो आणि दोन दिवसांतच आयकर विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येतात. यामध्ये संशय घेण्यासारखा विषय आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने काही बाबी सांगितल्या, तर आयकर विभागाचे अधिकारी कसे लगेच येतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सातारा शहरातील दत्त मंदिर, पंचमुखी गणेश मंदिर व साईबाबा मंदिरात भेट देवून तेथील व्यवस्थेची त्यांनी पहाणी केली, त्यावेळी देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आतापर्यंत हे अधिकारी का आले नाहीत? असा प्रश्न उपस्थित करून श्री. देसाई पुढे म्हणाले, जे कोणी कारखानदार आहेत, त्यांची कोणत्याही चौकशाला सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र, भाजपकडून खोटे पुरावे सादर केले जात आहेत. ज्यांनी स्वच्छ कारभार केलाय, त्यांच्याकडून काहीही निष्पन्न झालेलं नाही.

Kirit Somayya, Shambhuraj Desai
अजित पवार यांच्यावर छापे : राजकीय `क्रोनोलाॅजी` समजून घ्या...

यापूर्वी देखील आपण असे आरोप पाहिलेत. किती तरी तपासण्याही झाल्या. मात्र, हाती काहीच लागली नाही. केंद्राच्या सत्ताधारी यंत्रणेचा वापर करुन महाविकास आघाडीतील नेत्यांवर खोटे आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) याबाबतचे खरे पुरावे सादर करावेत, त्यांनी उगाच स्टंटबाजी करुन सरकारी यंत्रणेचा वेळ वाया घालवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

Kirit Somayya, Shambhuraj Desai
तर, आम्हाला किरीट सोमय्यांकडे जावे लागेल : नितीन पाटील

दरम्यान, शासनाने आजपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली केली आहेत. नागरिकांनी धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेट देत असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच भेट द्यावी. तसेच धार्मिक स्थळांना भेटी देत असताना नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही देसाई यांनी केले.

Related Stories

No stories found.