Shivsena : वाई, खंडाळ्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार; ४१ जणांचा शिवसेनेत प्रवेश

Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये वाई, खंडाळ्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आदींचा समावेश आहे.
Wai, Khandala People join Shivsena
Wai, Khandala People join Shivsenasarkarnama

Shivsena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव Purushottam Jadhav यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तसेच सरपंच व सदस्य अशा ४१ जणांनी आज मुंबईत नंदनवन बंगला येथे शिवसेनेत Shivsena जाहीर प्रवेश केला. यासर्वांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेच पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये वाई तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सदस्य दिनकर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. राधाबाई शिंदे, युवा नेते विकास शिंदे,वाई पालिकेच्या माजी नगरसेविका शोभाताई शिंदे, नवीन मुंबई राष्ट्रवादी महिला आघाडी उपाध्यक्षा राजश्रीताई येवले,माजी पंचायत समिती सदस्य राजेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविन्द्र भिलारे यांचा समावेश आहे.

तसेच लहुजी शक्ति सेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, बॅन्ड बॅन्जो संघटना जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे, वाई तालुका पश्चिम भाग धरणग्रस्त संघर्ष समिती रामचंद्र वीरकर, खंडाळा तालुक्यातील भादेच्या सरपंच निलंबरी बुणगे, युवा नेते महेश शेळके विकास धायगुडे, सरपंच आसगाव द्रोपदा शिंदे, सरपंच धोम डॉ. अविनाश नायकवडी यांचा समावेश आहे.

Wai, Khandala People join Shivsena
Karad : अश्विनी जगतापांच्या विजयाने सुपन्यात आनंद; माहेरवाशीन विधीमंडळात पोहोचल्याचा अभिमान

या समवेत धोम उपसरपंच सचिन कांबळे, युवराज कोंढाळकर, तुकाराम तुपे, कृष्णा नवखणे, जोर सरपंच नारायण सपकाळ, सुधाकर पाटील, बोरगाव सरपंच विष्णुदादा वाडकर, भगवान महांगडे पसरणी सोसायटी, पसरणी सरपंच राजेश शिर्के, आसरे उपसरपंच ऋषीकांत सणस, आकोशी उपसरपंच युवराज भणगे, जांभळीचे सरपंच सोपानशेठ चिकणे.

Wai, Khandala People join Shivsena
Satara News: मोदी हटाव संसार बचाव... गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

जोर उपसरपंच लक्ष्मणराव जाडे, कोंढवली सरपंच राजेंद्र चोरट, कोंढवली सरपंच अमोल चोरट, वासोळे सरपंच बाळासाहेब कोंढाळकर, वेलंगचे सरपंच विकास जाधव, चिखली सोसायटीचे दत्तात्रेय वाडकर, विष्णुशेठ नवघणे, लक्ष्मण सणस, व्याहळीच्या सरपंच सुजाता कांबळे, आनंदराव कोंढाळकर, विकास वाशीवले, किसन गोवेकर, कृष्णा बरकडे आदींचा समावेश आहे.

Wai, Khandala People join Shivsena
Pune By-Election : कसब्यातील विजयातून महाविकास आघाडीला गवसला लोकसभेचा उमेदवार !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com