त्या प्रकरणात बच्चू कडू यांना मिळाला जमीन

राज्यातील मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांपूर्वी आंदोलन केले होते.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - राज्यातील मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांपूर्वी आंदोलन केले होते. या आंदोलनात बच्चू कडू यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात बच्चू कडू यांना आज जामीन मंजूर झाला आहे. ( In that case, Bachchu Kadu got the land )

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव येथील शेती व पाणी प्रश्नांबाबत 2017 मध्ये शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संगमनेर रस्त्यावरील पाटबंधारे कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. त्यावरून रघुनाथदादा पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी राज्यमंत्री कडू यांच्यासह सर्व आंदोलकांना श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Bacchu Kadu
राज्यमंत्री बच्चू कडू मध्यरात्री मदतीला धावले, अन् युवकाचे प्राण वाचले...

शेती व पाणी प्रश्नाबाबत पाटबंधारे कार्यालयात 18 एप्रिल 2017 रोजी रघुनाथदादा पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ लिपिक दिलीप नारायण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, कालिदास आपेट, अजय महाराज बारस्कर, बाळासाहेब पटारे, अनिल औताडे, युवराज जगताप, भिकचंद मुठे, डॉ. शंकर मुठे, रुपेश काले, रमेश मुठे, रघुनाथ मुठे, शिवाजी मुठे, संजय गवारे, चांगदेव मुठे, पराजी शिंदे, भास्कर शिंदे, विलास कदम आदी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Bacchu Kadu
Video : चालीसा, भोंगे यासारखे मुद्दे उपस्थित करणारे मूर्ख : बच्चू कडू

यापूर्वी रघुनाथदादा पाटील यांच्यासह 17 आंदोलकांना जामीन मंजूर झालेला होता. मात्र, राज्यमंत्री कडू आणि अजय महाराज बारस्कर यांची जामीन प्रक्रिया झालेली नव्हती. यासाठी शनिवारी (ता. 21) राज्यमंत्री कडू व बारस्कर हे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले. त्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. याबाबत पुढील सुनावणी 5 जुलै रोजी होणार असल्याची माहिती अॅड. बाबासाहेब मुठे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com