Solapur Election : मोहिते-पाटील, शिंदे, काळे, पाटील, बागलांची प्रतिष्ठा पणाला लागणार : डीसीसीसह ४ काखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू

सोलापूर जिल्ह्यातील बदललेले राजकीय समिकरण, राज्यात सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस सरकार यामुळे बँकेची यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Sanjay Shinde, Ranjit Singh Mohite Patil, Kalyan Kale, Narayan Patil, Rashmi Bagal
Sanjay Shinde, Ranjit Singh Mohite Patil, Kalyan Kale, Narayan Patil, Rashmi BagalSarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा (Election) धुराळा लवकरच उडणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह (District Bank) चार सहकारी साखर कारखाने (Sugar Factory), दोन सहकारी सूत गिरण्यांची निवडणूक घेण्यासाठी १ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. या संस्थांच्या निवडणुकांसाठी १ फेब्रुवारी या अर्हतेवर मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिल्या आहेत. (In Solapur, election process of four sugar Factory along with the district bank has started)

दरम्यान, साखर कारखाने आणि जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे, शिवसेनेच्या नेत्या रश्‍मी बागल यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणार आहे.

Sanjay Shinde, Ranjit Singh Mohite Patil, Kalyan Kale, Narayan Patil, Rashmi Bagal
Prateek Patil News : जयंत पाटलांनी आपला राजकीय वारस निवडला : राजारामबापू कारखान्याची धुरा दिली हाती

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जाहीर झालेली प्रक्रिया थांबविण्यात आली होती. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आता पुन्हा एकदा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबत जालना व रायगड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचीही प्रक्रिया सुरू झाली आहे.

Sanjay Shinde, Ranjit Singh Mohite Patil, Kalyan Kale, Narayan Patil, Rashmi Bagal
Shashikant Warishe Murder Case : वारीशेंच्या हत्येचा कट रत्नागिरीतील बंगल्यावर शिजला : शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बँकेचे तत्कालिन अध्यक्ष राजन पाटील यांचे संचालक मंडळ बरखास्त करून या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास पाच वर्षांपासून या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. जिल्ह्यातील बदललेले राजकीय समिकरण, राज्यात सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस सरकार यामुळे बँकेची यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Sanjay Shinde, Ranjit Singh Mohite Patil, Kalyan Kale, Narayan Patil, Rashmi Bagal
Chinchwad By-Election : भाजपचं टेन्शन वाढणार; महेश लांडगेंच्या ट्विटर पोलमध्ये राष्ट्रवादीच्या काटेंना पसंती

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखाना, पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या शिवाय माळशिरस तालुक्यातील हरणाई सहकारी सूत गिरणी व सांगोला तालुक्यातील शेतकरी महिला सूत गिरणीच्या संचालक मंडळाचीही निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Sanjay Shinde, Ranjit Singh Mohite Patil, Kalyan Kale, Narayan Patil, Rashmi Bagal
Congress Leader rejected KCR offer : ‘अण्णा, माफ करा. तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही’ : सोलापूरच्या नेत्याने नाकारली ‘KCR’ची ऑफर

मतदार याद्या ठरणार महत्वाच्या

राज्यातील ‘अ’ वर्गातील ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांची मुदत संपते, त्याच्या १५० दिवस आगोदर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील या सात सहकारी संस्थांसाठी १ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. या संस्थांसाठी येत्या जून-जुलैमध्ये प्रत्यक्षात मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी महत्वाची असल्याने निवडणुकीत डाव-प्रतिडावांची सुरुवात ही मतदार याद्यांपासूनच केली जात असल्याने ही प्रक्रिया कशी पार पाडते? यावरही बरेच काही अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com