सुशीलकुमार शिंदे राजकारणापासून अलिप्त झाले अन्‌ सोलापूर काँग्रेसला घरघर लागली!

काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावाची शिफारस स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली होती. पण, म्हेत्रे यांचे नाव डावलून धवलसिंह मोहिते-पाटलांना वरिष्ठ पातळीवरून संधी देण्यात आली
SushilKumar Shinde
SushilKumar ShindeSarkarnama

सोलापूर : भाजपशी (BJP) संघर्ष करताना काँग्रेसला (Congress) पुन्हा ‘अच्छे दिन’ येतील, ही आशाही आता देशपातळीवर काँग्रेसला घरघर लागल्याने मावळू लागली आहे. काँग्रेसच्या सोलापूर (Solapur) जिल्हाध्यक्षपदासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावाची शिफारस स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली होती. पण, म्हेत्रे यांचे नाव डावलून धवलसिंह मोहिते-पाटलांना वरिष्ठ पातळीवरून संधी देण्यात आली. ज्यांनी कधीही काँग्रेस पाहिली नाही, त्यांना संधी दिल्याने पक्षातील निष्ठावंत नाराज झाल्याचे दिसून येत आहे. मोहिते पाटील हे ग्रामीण भागात तालुकानिहाय दौरे करताना बहुतेकवेळा तेथील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे जुन्या नव्यांचा हा वाद आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. (In Solapur district old-new dispute increased in Congress)

जनसेवा संघटनेच्या माध्यमातून जिल्हाभर संघटनात्मक बांधणी मजबूत करणारे धवलसिंह मोहिते पाटील यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली. काँग्रेस भवनात ते पहिल्यांदा आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. पक्ष संघटना मजबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, पण, त्यांना बड्या नेत्यांची अपेक्षित अद्यापपर्यंत साथ मिळालेली नाही. प्रणिती शिंदे यांना पक्षाने प्रदेश कार्याध्यक्ष केल्याने त्यांनाही ग्रामीण भागासाठी विशेष वेळ देता आलेला नाही.

SushilKumar Shinde
राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

दुसरीकडे, प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांसह भाजप, एमआयएमने मोर्चेबांधणी करायला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसमधीलच काही नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात येत आहे, त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना इतरत्र लक्ष द्यायला पुरेसा मिळत नाही, सद्यस्थिती आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत, तरीही काँग्रेससमोरील अडचणी दूर झालेल्या नाहीत. पक्षात गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढलेली असतानाही संपर्कप्रमुख किंवा जिल्ह्याचे प्रभारी त्याकडे लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.

SushilKumar Shinde
राष्ट्रवादीला धक्का देणारे अभिजित पाटलांच्या कारखाना, घर, ऑफिसवर इन्कम टॅक्सचे छापे

काँग्रेसला उभारी देणाऱ्या नेत्याची गरज

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा, करमाळा व शहर मध्य हे मतदारसंघ काँग्रसचे बालेकिल्ले होते. याशिवाय इतर मतदारसंघातही काँग्रेसची संघटना जोमात होती. परंतु, सोलापूरची काँग्रेस केवळ ‘शहर मध्य’ मतदारसंघापुरतीच शिल्लक राहिल्याची स्थिती आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात (स्व.) भारत भालके यांनी काँग्रेसची ताकद वाढविली होती. पण, आता त्याठिकाणी भाजपचे समाधान आवताडे आमदार आहेत. जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या गावातून काँग्रेस हद्दपार होत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली होती. प्रत्येक तालुक्यांतील, गावातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ते नावानिशी ओळखत होते. पण, ते राजकारणापासून अलिप्त झाले आणि काँग्रेसला घरघर लागली. आता पक्षाला उभारी देणाऱ्या नेत्याची गरज सोलापूर काँग्रेसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in