Phaltan Crime News : शिवशक्ती परिक्रमा रॅलीत नेत्यांच्या सोन्याच्या चेनवर चोरट्यांचा डल्ला...

Phaltan BJP पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू असून आज फलटण शहरात आगमन होताच क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
Phaltan Crime News
Phaltan Crime Newssarkarnama

-किरण बोळे

Phaltan Crime News : माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा रॅलीचे फलटण शहरात स्वागतप्रसंगी गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी तिघांच्या गळ्यातील सुमारे साडे पंधरा तोळे वजनाच्या सोन्याच्या चेन लांबविल्या. मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही क्रांतीसिंह नाना पाटील चौकात हा प्रकार घडल्याने 'चोर पोलिसांवर ठरले मोर' अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या.

पंकजा मुंडे Pankaja Munde यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू असून आज फलटण Phaltan City शहरात आगमन होताच क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते. काही पोलीस साध्या वेशात होते.

Phaltan Crime News
Manoj Jarange Live : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगे-पाटलांचं ठरलं; उद्या सकाळी ११ वाजता घेणार निर्णय

पंकजा मुंडे यांचा ताफा थांबताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडी भोवती गर्दी केली. या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी हात चलाखी करत अनेक नेत्यांच्या गळ्यातील चेन लंपास केल्या. यामध्ये भाजप डॉक्टर सेलचे फलटण शहराध्यक्ष डॉ. सुभाष गुळवे यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन, सांगवी (ता. फलटण) येथील महादेव कदम यांच्या गळ्यातील तब्बल साडेदहा तोळ्याची चेन, पोपटराव मिंड यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन लांबवली.

Phaltan Crime News
Satara NCP News : शशिकांत शिंदेंची तोफ मुंबईत धडाडली; म्हणाले, जावळीकरांनो भाजपचे स्वार्थी राजकारण संपवा...

पंकजा मुंडे यांचा ताफा पुढे गेल्यानंतर आपल्या गळ्यातील चेन गायब झाल्याचे संबंधिताच्या लक्षात आले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांच्या कानावर त्यांनी चोरीची कल्पना दिली मात्र अज्ञात चोरटा सापडला नाही. याबाबत रात्री उशीरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in