हिंदुत्ववादी जन संघटनांचा साताऱ्यात जनआक्रोश ; केल्या 'या' मागण्या...

Satara : दोन वेगळ्या धर्मातील विवाहांना मुलीचे आई-वडील दोन धर्मगुरू यांची संमती बंधनकारक...
Satara Latest News
Satara Latest NewsSarkarnama

सातारा : लव जिहाद , गोवंश हत्या, वाढते धर्मांतरण देशातील महापुरुषांची होत असलेली विटंबना या विविध वाढत्या अपप्रवृत्तीच्या विरोधात साताऱ्यात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी जनसंघटनाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध संघटनांचे हजारो प्रतिनिधी सहभागी झाले होते.

लव जिहादला यावेळी विरोध करण्यात आला. हा मोर्चा राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. लव जिहाद वर तातडीने बंधन आणून हिरवा दहशतवाद संपवण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली

या मोर्चामध्ये भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, (Jayakumar Gore) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे प्रदेश सरचिटणीस विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, धर्मवीर संभाजी युवा मंच प्रशांत नलावडे, धनंजय जांभळे, भाजपचे सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, तसेच विविध हिंदुत्ववादी जन संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते. (Satara Latest News)

Satara Latest News
Tukaram Mundhe : तडकाफडकी बदलीनंतर तुकाराम मुंढें पहिल्यांदाच ट्विटरवर झाले व्यक्त; म्हणाले...

सुमारे दोन ते तीन हजार हिंदुत्ववादी सदस्यांनी राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. लव जिहादच्या विरोधात कठोर कायदा केला जावा, ऑनलाईन डेटिंग ॲप आणि सोशल मीडिया ॲप यांना आधार कार्ड पॅन कार्ड केवायसी बंधनकारक करण्यात यावे, विशेष विवाह कायद्याचे तरतुदीत बदल करून राज्य सरकारने त्या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे,

Satara Latest News
Pune Politics: अजितदादांची खुली ऑफर; वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार ?

तसेच, दोन वेगळ्या धर्मातील विवाहांना मुलीचे आई-वडील दोन धर्मगुरू यांची संमती बंधनकारक करावी, धर्मादाय यांना विविध मार्गाने मिळत असलेल्या आर्थिक मदतीवर त्वरित बंदी घालावी, आफताब पुनावाला यांनी श्रद्धा वालकरच्या हत्या केली याविरोधात त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, न्यायालयाचा आदेश असूनही मशिदी वरचे भोंगे उतरवले जात नाही त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी, महिला सुरक्षेसाठी आवश्यक ते कायदे बनवावेत शाळा कॉलेज विद्यापीठ यांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याचे बंधन करण्यात यावे, धर्मांतरण बंदी कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या महापुरुषांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्यांना गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई व्हावी, गोवंशहत्या बंदी कायदा अधिक बळकट केला जावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आले असून याची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही पाठवण्यात आली आहे

दरम्यान, या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी जनसंघटनांचा जोरदार जन आक्रोश पाहायला मिळाला. या वेळी जय श्रीरामच्या जोरदार घोषणांनी सातारा शहर निनादले राजवाडा मोती चौक, देवी चौक, शाहू चौक वय नाका व तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन ते तीन हजार हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय दाखल झाले तेथे अनेक मान्यवरांनी या मोर्चात सहभागी झालेल्या सदस्यांना मार्गदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com