राजकारणात गाफील राहून चालत नसते

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष ( NCP ) संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील ( Jayant Patil ) हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करत आहेत.
राजकारणात गाफील राहून चालत नसते
जयंत पाटीलsarkarnama

कुकाणे : अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करत आहेत. या निमित्त त्यांनी आज (गुरुवारी) नेवासे आणि राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

भेंडे (ता. नेवासे) येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे अंतर्गत कार्यकर्त्यांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. या प्रसंगी व्यासपीठावर महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार पांडुरंग अभंग, अॅड. देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले पाटील, प्रताप ढाकणे, संदीप वर्पे, आंबादास गारूडकर, संजय कोळगे आदी उपस्थित होते.

जयंत पाटील
जयंत पाटील यांनी गटबाजीवरून श्रीगोंदयातील नेत्यांना दिल्या कानपिचक्या

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जातीधर्मीयांना बरोबर घेऊन जाणारा, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत रुजला पाहिजे. याच उद्देशाने राष्ट्रवादी परिवार संवाद आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्याही पक्षापेक्षा उत्तुंग, उच्च व पितृतुल्य नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे रूपाने आपल्या पक्षाकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.

जयंत पाटील पुढे म्हणाले, "मागील निवडणुकीत विधानसभेच्या 114 जागा लढविल्या, त्यापैकी 54 जागा मिळाल्या. पराभूत 60 जागांचे काय? यामुळे या 60 जागांवर सुधारणा करण्यासाठी सर्व मतदार संघाचा दौरा करण्यात येत आहे. शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेतृत्व पक्षाकडे असतांना ही पक्ष का वाढत नाही असा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मनाला विचारून पक्षाचा विस्तार कसा. पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करा. भले कोणाशीही आघाडी असू द्या. मात्र आपले सैन्य आणि आपली यंत्रणा तयार ठेवणे महत्त्वाचे आहे. राजकारणात गाफील राहून चालत नसते.

जयंत पाटील
जयंत पाटील यांच्या दौऱ्याने वाढली मोनिका राजळेंसमोरील समस्या

राज्यात सरकार येऊन दीड पावणे दोन वर्षे झाले. बराच कालावधी कोरोनाचे संकटात गेला. सरकारच्या तिजोरीत पैसे येणे बंद झाले तरी ही सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखा पर्यंतची कर्ज माफी केली. आता निसर्गाची अवकृपा होत आहे. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्याचे एक पीक वाया गेले तर त्याचे सर्व बजेट बिघडते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून सरकार लवकरात लवकर योग्य ती मदत करेल असे ही पाटील यांनी सांगितले.

यावेळी डॉ.नरेंद्र घुले पाटील, पांडुरंग अभंग, तालुका अध्यक्ष काशीनाथ नवले आदींची भाषणे झाली. यावेळी अमोल अभंग, अशोक चौधरी, गफूर बागवान, संगीता गव्हाणे, दीपा गायकवाड आदी उपस्थित होते. गणेश गव्हाणे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in