संसदेत सुजय विखे व सुप्रिया सुळे यांच्यात झाली खडाखडी

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
Sujay Vikhe Patil, Supriya Sule
Sujay Vikhe Patil, Supriya SuleSarkarnama

दिल्ली - संसदेचे अधिवेशन सध्या दिल्लीत सुरू आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी प्रतिउत्तर दिले. या दोघांची संसदेतील भाषणे आज महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. ( In Parliament, there was a rift between Sujay Vikhe and Supriya Sule )

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, कोणत्याही सरकारची नीती समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींचे अभिभाषणातील सरकारने अधोरेखीत केलेला विकास समजणे आवश्यक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांची विकासाची गती सांगताना एक दिवसही पुरेसा ठरणार नाही. मोदींच्या दोन्ही कार्यकाळात मोठे काम झाले. मला दुःख होते की महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना व खासदारांना हा विकास दिसत नाही. अथवा तो विकास पाहू इच्छित नाहीत अथवा त्यांची मन की बात बाहेर येत नाही.

Sujay Vikhe Patil, Supriya Sule
Video : दुकानात वाईनविक्रिचा मुद्दा खासदार सुजय विखेंनी संसदेत मांडला..

ते पुढे म्हणाले की, मोदींच्या नेतृत्त्वाखाली रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात मागील एक वर्षात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले. त्याचे व्हिडिओ पाहिले तर या कार्यक्रमांच्या पहिल्या रांगेत महाविकास आघाडीचे नेते व लोकप्रतिनिधी पहायला मिळतील. एकीकडे तुम्ही या कार्यक्रमांत सहभागी होतात. महाविकास आघाडीचे नेते केंद्राच्या निधीतील कामांचा नारळ फोडताना मोदींचे नावही घेत नाहीत. माझ्या मतदार संघात 10 हजार किलोमीटर रस्त्यासाठी निधी दिला. माझ्या मतदार संघाचा विकास मागे राहिला होता. त्यातून विकासाला गती मिळाली आहे. तुम्ही विरोधी पक्षात आहात तुम्हाला टीका करण्याच अधिकार आहे. कार्यक्रमात सहभागी व्हायचे आणि विकासकामांवर काही बोलायचे नाही हा दुटप्पीपणा आहे.

Sujay Vikhe Patil, Supriya Sule
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

मी सहकार क्षेत्रातून आलो आहे. केंद्रात सर्वात प्रथम सहकार मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. हे स्वातंत्र्यानंतर कधीही झाले नाही. या मंत्रालयाची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्यात आली. युपीएचे नेते काल विचारत होते स्टार्ट अप इंडिया, आत्मनिर्भर भारत, काय आहे. माझे सौभाग्य आहे की माझ्या पंजोबांनी आशिया खंडातील सहकार तत्त्वावरील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. सहकारी चळवळ सुरू केली. युपीए सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक साखर कारखान्याला शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना कर्ज घेण्यासाठी दबाव आणला. त्यांच्या 10 वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने बंद केले आणि महाविकास आघाडीतील 70 टक्के मंत्र्यांनी याच बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना खूप कमी किमतीत विकत घेतले. आणि आता ते त्याचे मालक बनून बसले आहेत. हे त्यांचे सेक्युलिरिझम आहे. आमच्या सरकारने सहकारी साखर कारखान्यांना बळ दिले. निर्यात अनुदान दिले. बायोप्रोडक्टचे दर निश्चित केले. 1985 पासूनचा थकबाकी कर माफ केला.

Sujay Vikhe Patil, Supriya Sule
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

केंद्र सरकारने पेट्रोलवर 5 रुपये व डिझेलवर 10 रुपये सूट दिली. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एक रुपयाही कमी केला नाही. उलट दारूचा उत्पादन शुल्क कमी केला. दारु स्वस्त व पेट्रोल महाग अशी स्थिती निर्माण केली. दारू प्या मात्र वाहन चालवू नका असा संदेशच जणू महाविकास आघाडीला द्यायचा आहे. ते वाईनला दारू म्हणत नाहीत मात्र वाईनच्या बाटली मागे अल्कहोलचे प्रमाण दिले आहे. ते कशासाठी? त्यांना वाटत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी नशेत रहावे. त्यांना जनतेचे पाप दिसू नये. त्यांचा सत्तेचा नशा जनता लवकर उतरवेल, असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी लगावला.

Sujay Vikhe Patil, Supriya Sule
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, वाइनविक्रीच्या परवानगीत मोठा भ्रष्टाचार...

यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, खाल्लेल्या मीठाची जाण ठेवावी, ही माझ्या आईची शिकवण आहे. ती आमची संस्कृती आहे. 10 वर्षे तुम्ही ज्यांच्या बरोबर मंत्री राहिले. त्यांचे गांधी कुटुंबाबरोबर संबंध होते. संसदेत बोलताना आपली बाजू मांडावी मात्र आपला इतिहास विसरू नये. केंद्राच्या वयोश्री योजनेचा डाटा तुम्ही तपासा. मागील 2 ते 3 वर्षांत सलग पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत हे पहावे.

सुळे पुढे म्हणाल्या, आम्ही आभार मानत नाहीत, असे ते म्हणाले. आम्ही एवढे ही कृतघ्न नाहीत. माझे व आमच्या सर्वांचे ट्विटर हॅन्डल तपासा. जो चांगले काम करतो त्याचे आम्ही खासगीत नव्हे तर ट्विटरवर जाहीर आभार मानतो. चांगल्या कामाला चांगले म्हणतो ही आमची संस्कृती आहे. ते नवीन आहेत. उत्साहात आहेत. मात्र चांगले बोलले. त्यांचे भविष्यही उज्वल आहे. त्यांनी गृहपाठ करून अभ्यास करून बोलावे, असे प्रतिउत्तर खासदार सुळे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in