Koregaon APMC News : कोरेगावात महेश शिंदे-शशिकांत शिंदेंच्या गटात काट्याची टक्कर

Shashikant Shinde आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल आणि आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनेल रिंगणात उतरले आहे.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

-पांडुरंग बर्गे

Koregaon APMC News : कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल आणि आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनेल अशी काट्याची टक्कर हाोत आहे. उर्वरित ११ उमेदवार हे स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.

अआमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने सोसायटी मतदारसंघातून ॲड. पांडुरंग चंद्रकांत भोसले, जयवंत साहेबराव घोरपडे, कल्याण किसन भोसले, दिलीप शामराव अहिरेकर, प्रमोद लक्ष्मण धुमाळ, राहुल शिवाजी निकम, अधिक दत्तात्रय माने, महिला राखीव मतदारसंघातून वैशाली हणमंतराव भोसले, साधना संजय चव्हाण.

तसेच नागरिकांचा इतर मागास प्रवर्गातून ॲड. अमोल रत्नाकर रशिंनकर, ग्रामपंचायत मतदारसंघातून बापूसाहेब पांडुरंग चव्हाण, विशाल विष्णू शिंगटे, आर्थिक दुर्बल मतदारसंघातून आनंद विठ्ठल जाधव, अनुसूचित जाती मतदारसंघातून गोविंद चंद्रकांत कदम, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून केशव बाळकृष्ण मदने, व्यापारी व अडते मतदारसंघातून राहुल सुधाकर बर्गे, रेवणसिद्ध ज्ञानेश्वर महाजन यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara News : सातारचे दोन्ही राजे शशिकांत शिंदेंच्या प्रेमात; महेश शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न..

आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनेलने सोसायटी मतदारसंघातून संजय बाजीराव सकुंडे, उमेश जनार्दन जगदाळे, नवनाथ निवृत्ती केंजळे, गुलाब बळिराम बर्गे, दत्तात्रय कृष्णा गायकवाड, रणजित शिवाजी माने, राजेंद्र साहेबराव नलावडे, महिला राखीव मतदारसंघातून पूजा अनिल शिंदे, वनिता भरत साळुंखे.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Shashikant Shinde Vs Mahesh Shinde: साताऱ्यात राजकारण तापलं; जिहे-कटापूर पाणी योजनेवरुन शशिकांत शिंदे- महेश शिंदेंमध्ये जुंपली

तसेच नागरिकांचा इतर मागास प्रवर्गातून बाळकृष्ण आनंदराव घाडगे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून दत्तात्रय कृष्णा खताळ, ग्रामपंचायत मतदारसंघातून पंकज शंकर पवार, जवानसिंग बाबूराव घोरपडे, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून युवराज दत्तात्रय धुमाळ, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून बबनराव शंकर कांबळे, व्यापारी व अडते मतदारसंघातून सुनील ज्योतिर्लिंग निदान, मनोज पांडुरंग महाजन यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Aditya Thackeray यांचे Eknath Shinde यांच्यावर गंभीर आरोप। Shivsena । Politics |Sarkarnama

हमाल मापाडी मतदारसंघातून संजय गोरख बर्गे, दत्तात्रय विश्वनाथ गाडे, सेवा सोसायटी मतदारसंघातून चंद्रकांत हणमंत कदम, धनंजय विनायक यादव, समीर सुरेश वीर, महेश रमेश साबळे, रमेश साहेबराव सोनवणे, ग्रामपंचायत मतदारसंघातून केतन अर्जुन चव्हाण, अभिमन्यू सर्जेराव शिर्के, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून रूपेश सीताराम सपकाळ, व्यापार अडते मतदारसंघातून महेश ज्ञानदेव कदम हे ११ उमेदवार स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Ajit Pawar यांची फटकेबाजी ; बघा, दिलखुलास मुलाखत Live | Sarkarnama

कोरेगाव बाजार समितीत आमदार महेश शिंदे व आमदार शशिकांत शिंदे यांचे गट आमने सामने असून या दोन्ही आमदारांनी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी चुरशीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे या दोन्ही आमदारांच्या तोफा आता धडाडणार आहेत.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon News : अखंड भारत तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडूया : शशिकांत शिंदे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com