एन.डी. पाटील अनंतात विलीन

कोल्हापुरातील (Kolhapur) कसबा बावडा येथील स्मशानभूमीत एन. डी. पाटील (N.D. Patil) यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
एन.डी. पाटील अनंतात विलीन
N.D. Patil

कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री एन. डी. पाटील (N.D.Patil) यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापुरातील (Kolhapur) कसबा बावडा येथील स्मशानभूमीत एन. डी. पाटील यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

N.D. Patil
पंतप्रधानांना धमकी दिल्याप्रकरणी साताऱ्यात पटोलेंविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार

महाराष्ट्राच्या (Maharashtra) पुरोगामी, डाव्या चळवळीचे अग्रणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील (N. D. Patil) यांनी सोमवारी (१७ जानेवारी) अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. आज त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

N.D. Patil
पंतप्रधानांना धमकी दिल्याप्रकरणी साताऱ्यात पटोलेंविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार

दरम्यान, मागील काही दिवसांपर्यंत एन. डी. पाटील यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने शोषित, वंचितांचा आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एन. डी. पाटील यांनी अनेक लढ्यांचे नेतृत्व केलं असून महाराष्ट्राचा एक पुरोगामी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी लोकांशी बांधिलकी मानुन काम करणारा हा लढवय्या लोकनेता होता. एकाचवेळी अनेक संस्थांचे नेतृत्व करत असताना त्या संस्थाचा कारभार आदर्श रीतीने झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिली आहे.

महाराष्ट्राचे सहकारमंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. १९७८ साली त्यांना पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामकाजाची आजही चर्चा होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली. मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अंमलात आणला. एन डी पाटील यांच्यासमोर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श होता, त्याच आदर्शाने ते आयुष्यभर वागले. सत्तेत जायची संधी मिळाली, पण तेव्हाही त्यांच्या जगण्यात आणि साधेपणात काहीही फरक पडला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.