खासदार संजय मंडलिकांचे बंड ठरले सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे!

निकालानंतर चर्चा झाली ती विरोधी पॅनेलमधील तिघांच्या विजयाची आणि इतरांना पडलेल्या मतांचीच.
mp sanjay mandlik
mp sanjay mandliksarkarnama

कोल्हापूर : आयत्यावेळी करावी लागलेली पॅनेलची रचना, त्यामुळे ऐनवेळी ठरलेले उमेदवार, काही उमेदवारांची चुकलेली निवड अशा स्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Kolhapur District Bank Election) विरोधकांना पडलेली मते सत्ताधाऱ्यांना विचार करायला लावणारी आहेत. मतदानापूर्वी आठ दिवस हे पॅनेल तयार झाले होते. आणखी काही दिवसांचा अवधी मिळाला असता तर राखीव गटातील निकालाचे चित्र वेगळे असते, अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), आमदार डॉ. विनय कोरे व पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ गटाने १८ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले; पण निकालानंतर चर्चा झाली ती विरोधी पॅनेलमधील तिघांच्या विजयाची आणि इतरांना पडलेल्या मतांचीच.

mp sanjay mandlik
जिल्हा दुध संघ : मातब्बरांना पराभवाची धुळ; सत्ताधारी आघाडीचा मोठा विजय

अखेरच्या क्षणी विरोधी पॅनेलची बांधणी झाली. त्यामुळे रिंगणात जे जे राहिले त्यांना घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शिवसेनेने मागणी केलेल्या तीन जागा दिल्या असत्या तर कदाचित विरोधी पॅनेलच झाले नसते; पण हा प्रस्ताव नाकारल्याने खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी बंड केले. त्यांनी प्रक्रिया गटात मतांचा गठ्ठा सोबत असलेल्या बाबासाहेब पाटील यांना सोबत घेतले. पतसंस्था गटातून यापूर्वीच तयारी केलेले आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू प्रा. अर्जुन आबिटकर त्यांना मिळाले; पण इतर उमेदवारांची केवळ जुळवाजुळव करावी लागली. तरीही आठ दिवसांत उमेदवारांना मिळालेली मते पाहता सत्ताधाऱ्यांवरील रोष दिसून येत होता.

यात निवडणूक यंत्रणेकडून तालुकानिहाय मतमोजणी करणार असल्याची माहिती दिली. त्यातून प्रा. मंडलिक, आमदार आबिटकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरच राग काढला. यंत्रणेचा हा निर्णयही सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडल्याचे निकालावरून दिसून येते. मतमोजणी राखीव गटांच्या मतपत्रिका एकत्रित करूनच झाली, हाच निर्णय पूर्वी जाहीर केला असता तरीही निकालावर परिणाम झाला असता, असा दावा पराभूत उमेदवारांकडून केला जात आहे.

mp sanjay mandlik
सासूसाठी भांडण केलं... पण सासूच आली वाटणीला : विनय कोरेंची अवस्था

नवख्या क्रांतिसिंहांनी फोडला घाम

इतर संस्था गटात विरोधी पॅनेलकडून माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांचे पुत्र क्रांतिसिंह यांना उमेदवारी देण्यात आली. या गटात सत्तारूढ गटाकडून विद्यमान संचालक भय्या माने रिंगणात होते. या गटात एकूण ३९९४ मतदान झाले. त्यापैकी १६५५ मते क्रांतिसिंह यांना पडली. माने यांना २२६५ मते मिळाली; पण गटात क्रांतिसिंह यांना माने यांनीच घाम फोडल्याचे त्यांना पडलेल्या मतांवरून दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com