कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे झाले पुन्हा सक्रिय

भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) मतदार संघात अॅक्टिव्ह झाल्याने भाजप कार्यकर्त्यांची गळती थांबेल असा विश्वास भाजप नेत्यांत निर्माण झाला आहे.
ram shinde
ram shindesarkarnama

कर्जत : आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदार संघात विविध कार्यक्रमांची आयोजने सुरू असतानाच माजी मंत्री राम शिंदे यांनी मतदारांच्या गाठी भेटीचे सत्र सुरू केले आहे. राम शिंदे मतदार संघात अॅक्टिव्ह झाल्याने भाजप कार्यकर्त्यांची गळती थांबेल असा विश्वास भाजप नेत्यांत निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केल्याचे संकेत आहेत.

नमस्ते, काय चाललंय, बरं आहे का? घरातील वडीलधारी मंडळींसह बच्चे कंपनी कशी आहे? कोरोनाची लस घेतली का? लस घेतली असली तरी काळजी घ्या, कोरोना प्रतिबंधक नियमपाळा? शेतात काय आहे? यासह अनेक प्रश्न विचारीत आस्थेवाईकपणे चौकशी करीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे कर्जत शहरासह परिसर पिंजून काढीत आहेत.

ram shinde
भुजबळ, वडेट्टीवार खोटारडे, केंद्रावर दोषारोप करतात : राम शिंदे यांचा आरोप

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांनी विजय मिळवीत मुसंडी मारली. या नव्या पर्वाचे परिणाम सर्वांना सुरवातीला भासू लागले आणि अलीकडे दिसू लागले आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार या उक्तीप्रमाणे सोयीचे राजकारण सुरू झाले. परिणामी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांसह सुरू झालेले आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत इनकमिंगचे नेटवर्क विस्तारले. भाजपमधील मोठे मासे गळाला लागू लागले आहेत.

अलीकडे भाजपची पडझड झाली असून प्रा.राम शिंदे यांचे एकेकाळी खंदे समर्थक व सावली सारखे मागेपुढे असणारे पदाधिकारी आणि करकर्ते भाजपला सोडचिठ्ठी देत हातावर घड्याळ बांधित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

ram shinde
अजित पवार व  माझ्यात कोणतीही बैठक झाली नाही ः राम शिंदे यांचे स्पष्टीकरण

भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये सुरवातीला महत्वाच्या गृह सह सात खात्यांचे राज्यमंत्रीपद तदनंतर कामगिरी उंचावत जलसंपदा, राजशिष्टाचार सह इतर खात्याचे कॅबिनेट मंत्री अशी प्रा. शिंदे यांची कमान उंचावत गेली. अल्पकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नाळ जुळून त्यांचे अत्यंत विश्वासू वर्तुळात शिंदे यांची एन्ट्री झाली. मात्र विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्याकडून लक्ष्यवेधी लढतीत राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राम शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला.

त्यांचा पराभव आणि रोहित पवार यांच्या विजयाची मोठी कारणमीमांसा झाली, चर्चा झाली. हा पराभव मात्र प्रा.शिंदे यांच्या जिव्हारी लागला. मोठा विकासनिधी, विकासकामे करून सुद्धा कुठे माशी शिंकली? या बाबत तर्कवितर्क लढवले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजयी उमेदवार आमदार रोहित पवार कुटुंबासह त्याच दिवशी प्रा.राम शिंदे यांच्या भेटीला गेले. त्यांच्या मातोश्रीचे दर्शन घेतले. त्यांनीही फेटा बांधून सत्कार करीत दिलदारपणाचे दर्शन घडविले. त्यानंतर अपवाद सोडल्यास प्रा.शिंदे यांनी काही काळ दूर राहणे पसंत केले.

ram shinde
आमदार नीलेश लंके म्हणाले, कर्जत-जामखेडची जनता भाग्यवान

त्यांचे समर्थक म्हणून असलेल्या प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रसाद ढोकरीकर, नगरसेविका मनीषा सोनमाळी, उषा म्हेत्रे-राऊत, हर्षदा काळदाते, सतीश सुद्रिक, नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेवक लालासाहेब शेळके, नितीन तोरडमल, राजेंद्र पाटील, यांच्यासह विश्वासू पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजपला सोडले. मात्र तरीही न खचता डगमगता पुन्हा एकदा सर्वांच्या गाठीभेटी घेत प्रा.राम शिंदे परिसर पिंजून काढत आहेत. त्यांच्या समवेत जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, सरपंच काकासाहेब धांडे, किसान सेलचे सुनील यादव, तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, भाजप शहराध्यक्ष वैभव शहा, युवक नेते गणेश क्षीरसागर, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, नगरसेवक राणी गदादे, अनिल गदादे, महिला आघाडीच्या मनीषा वडे, शरद म्हेत्रे, सोशल मीडियाचे गणेश पालवे यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

नुकतीच प्रा. राम शिंदे गाठीभेटी घेत असताना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांची कार्यकर्त्यांसह बैठक सुरू होती तिथे आगमन झाले. दोघांनीही नमस्कार करीत एकत्र कॉफी घेतली. मात्र याची चर्चा शहरासह तालुकाभर सुरू झाली. प्रवीण घुले पूर्वाश्रमीचे विखे पाटील परिवाराचे खंदे समर्थक होते. मात्र मध्यंतरी डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली घुले काँग्रेसची पडझड होत असताना एकनिष्ठ राहिले.मात्र या भेटीनंतर शहरासह तालुकाभर चर्चा सुरू झाली आहे.

सत्तापदे येतात जातात मात्र आपण यशाने हुरळून ही जात नाही आणि अपयशाने खचून ही जात नाही.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालाय त्यामुळे सर्वसामान्यांशी माझी नाळ जुळली आहे, ती कायम राहील.

- प्रा. राम शिंदे, माजी मंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com