Jawali-Mahabaleshwar APMC : जावळी-महाबळेश्वरला भाजप,राष्ट्रवादी एकत्र; पवार, सपकाळांची एकाकी झुंज...

Deepak Pawar राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपच्या आमदारांना साथ दिल्याने नाराज झालेल्या दीपक पवार यांनी याबाबतची तक्रार खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे.
Shashikant Shinde, Makrand patil, Deepak Pawar, Sadashiv Sapkal, Shivendraraje Bhosale
Shashikant Shinde, Makrand patil, Deepak Pawar, Sadashiv Sapkal, Shivendraraje Bhosalesarkarnama

-प्रशांत गुजर, महेश बारटक्के

Jawali-Mahabaleshwar APMC : जावळी- महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ ठरले माघारीचे दिवशी सहा जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १२ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. येथे माजी आमदार सदाशिव सपकाळ Sadashiv sapkal व राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार Deepak Pawar यांच्या पॅनेलच्या विरोधात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde, आमदार मकरंद पाटील, तसेच वसंतराव मानकुमरे, अमित कदम यांचे पॅनेल उभे ठाकल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

कृषी उत्पन्न व बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण सात जागेसाठी गणेश आनंदा कवी, रवींद्र बबनराव गोळे, लक्ष्मण बाबूराव जाधव, भास्कर आबाजी पवार, मधुकर बबनराव पोफळे, राजेंद्र सखाराम भिलारे, सर्जेराव दादू मर्ढेकर, मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक, हनुमंत सहदेव शिंगटे, जयदीप शिवाजीराव शिंदे, प्रमोद शंकर शिंदे, हेमंत हिंदुराव शिंदे आणि प्रमोद बाजीराव शेलार यांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.

ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण दोन जागांसाठी बजरंग पांडुरंग गुजर, गुलाब विठ्ठल गोळे, साईबाबा दगडू जगताप आणि बुवासाहेब एकनाथराव पिसाळ, तसेच अनुज्ञप्तीधारक व्यापारी, आडते मतदारसंघातून दोन जागेसाठी दत्तात्रय कोंडिबा कदम, प्रकाश कृष्णाजी जेधे आणि रमेश लक्ष्मण सपकाळ, तर ग्रामपंचायत मतदारसंघातील अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधीच्या एका जागेसाठी विद्या तुकाराम कदम आणि पांडुरंग कारंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Shashikant Shinde, Makrand patil, Deepak Pawar, Sadashiv Sapkal, Shivendraraje Bhosale
Satara News : सातारचे दोन्ही राजे शशिकांत शिंदेंच्या प्रेमात; महेश शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न..

कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सहकरी संस्था मतदारसंघातून महिला प्रतिनिधी कमल दिलीप दळवी व योगिता राजेंद्र शिंदे, तसेच कृषी पत व बहुउद्देशीय सेवा संस्था मतदारसंघातून इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मनेश जयसिंग फरांदे बिनविरोध झाले असून, कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी तुकाराम जानू शिंदे, तर ग्रामपंचायत मतदारसंघातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी रामचंद्र धोंडीबा भोसले, तसेच हमाल, मापाडी मतदारसंघातून सुंदर गोविंद भालेराव हे बिनविरोध निवडून आले आहेत.

Shashikant Shinde, Makrand patil, Deepak Pawar, Sadashiv Sapkal, Shivendraraje Bhosale
Nana Patole On Ajit Pawar : 'नाईलाज' शब्द वापरण्यापेक्षा शपथच घ्यायची नव्हती; पटोलेंनी अजित पवारांना सुनावलं !

या वेळेस शिवेसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ व राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, वसंतराव मानकुमरे, अमित कदम यांचे पॅनेल उभे ठाकले आहे. त्यामुळे येथे तीन आमदारांची ताकत पणाला लागली आहे.

Shashikant Shinde, Makrand patil, Deepak Pawar, Sadashiv Sapkal, Shivendraraje Bhosale
Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसांच्या कर्नाटकात सभा, आपल्या वक्तृत्वाची जादू दाखवणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com