इचलकरंजीत भाजपची आवडे गटाशी युती होणार : चंद्रकांतदादांचे संकेत

आमदार प्रकाश आवाडे यांच्याबरोबर युती करण्याचा निर्णय पुढील घडामोडीनंतर घेतला जाईल : चंद्रकांत पाटील
MLA Prakash Awade-chandrakant patil
MLA Prakash Awade-chandrakant patilSarkarnama

इचलकरंजी : नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळावर असला तरी पुढील काळात होणाऱ्या घडामोडीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येथे आज (ता. ९ डिसेंबर) दिली. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांच्याबरोबर भाजपची युती होण्याचे त्यांनी संकेत दिले. (In Ichalkaranji, BJP will form an alliance with MLA Prakash Awade's group)

पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ९ डिसेंबर) सांयकाळी भाजपचे पाटील यांनी इचलकरंजीचा दौरा केला. सुरुवातीला त्यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते. वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

MLA Prakash Awade-chandrakant patil
सूत्रे हाती येताच माजी आमदार सूर्यकांत दळवींनी केली मोठी घोषणा

ते म्हणाले, ‘‘पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण इचलकरंजीला भेट देत आहे. प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहे. पालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आमदार आवाडे यांच्याबरोबर युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण पुढे होणाऱ्या घडामोडीनंतर याबाबतचा ठोस निर्णय घेतला जाईल.’’ भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या, शहाजी भोसले, नगरसेवक किसन शिंदे, युवराज माळी, माजी नगरसेवक दिलीप मुथा, सुनिल तोडकर, विश्वनाथ मेटे, सलीम शिकलगार आदी उपस्थीत होते.

MLA Prakash Awade-chandrakant patil
महाडिकांकडून भरमू पाटलांना निरोप गेल्यास राष्ट्रवादीचे आमदार पाटील होणार बिनविरोध

युती की स्वबळ : हाळवणकर घेणार निर्णय

माजी आमदार हाळवणकर यांच्या उपस्थितीत पाटील यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवकांशी संवाद साधला. पालिका निवडणुकीबाबत भूमिका जाणून घेतली. संभाव्य युतीबाबत कार्यकर्त्यांनी विचारणा केली. त्याबाबत युती करायची की स्वबळावर निवडणूक लढवायची याचे सर्वाधिकार माजी आमदार हाळवणकर यांच्याकडे राहतील, असे पाटील यांनी सांगितले. नगरसेवकांच्या अडचणी ऐकून घेतल्या. नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com