कराडात मठासमोरच बंडातात्यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादीने मारले जोडे...

स्वतःला राजकीय Political झोतात व प्रसिद्धीस आणण्यासाठी बंडातात्यांनी Bandatatya केलेले वक्तव्य निषेधार्य आहेत.
Karad NCP Andolan
Karad NCP Andolansarkarnama

कऱ्हाड : कराडमधील मारूतीबवा कऱ्हाडकर मठासमोरच वाईन विक्रीवरून वारकरी नेते बंडातात्या कऱ्हाडकर यांनी काल साताऱ्यात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस व वारकऱ्यांतर्फे निषेध नोंदविण्यात आला. यावेळी बंडातात्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, रणजीत पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते. बंडातात्या कऱ्हाडकर यांनी काल साताऱ्यात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. मारूतीबुवा कऱ्हाडकर मठाच्या पायरीवर आंदोलन झाले. यावेळी उपस्थितांनी बंडातात्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारले. बंडातात्यांचा निषेध असो.., अशा घोषणा दिल्या. त्यावेळी बंडातात्या यांचे खरे नाव घेवूनही त्यांच्या निषेध करण्यात आला.

Karad NCP Andolan
राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बटाणे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केला. श्री. बटाणे म्हणाले, कऱ्हाडला वारकरी सांप्रदयाची मोठी परंपरा आहे. मात्र, बंडातात्या यांच्या वक्तव्याने त्याला डाग लागला आहे. शासनाच्या निर्णयावर वक्तव्यावर सुप्रिया सुळे, पंकजाताई मुंढे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सुपूत्र यांच्याबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. बंडातात्या वारकरी आहेत, त्यांच्या तोंडात ते शब्द शोभत नाहीत.

Karad NCP Andolan
'हभप' पदवीला मलीन करण्याचा बंडातात्या कराडकरांचा प्रयत्न....

कऱ्हाडकर मठाला दीडशे वर्षाची पंरपरा आहे. याच मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले. येथील भगवानमामा यांच्या हाताखाली ते शिकले. मात्र, आता ते सारे विसरले आहेत. वास्तविक त्यांनी सांप्रदायावर बोलायला हवे होते. मात्र ते राजकीय नेत्यांवर बोलले. ते चुकीचे आहे. स्वतःला राजकीय झोतात व प्रसिद्धीस आणण्यासाठी त्यांनी केलेले वक्तव्य निषेधार्य आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com