नवोदय विद्यालयात चार दिवसांत आढळले 82 कोरोना पॉझिटिव्ह

मागील चार दिवसांत या शाळेत तब्बल 82 जण कोरोना ( Corona ) बाधित आढळून आले.
नवोदय विद्यालयात चार दिवसांत आढळले 82 कोरोना पॉझिटिव्ह

Jawahar Navodaya Vidyalaya Takli Dhokeshwar

Sarkarnama

टाकळी ढोकेश्वर ( अहमदनगर ) : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे असलेल्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात चार दिवसांत तब्बल 82 कोरोना ( Corona ) रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. In four days, 82 corona infected patients were found in Jawahar Navodaya Vidyalaya

पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या मागील दोन महिन्यांपासून आटोक्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. यातच टाकळी ढोकेश्वर मधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात चार दिवसांत 82 कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व कोरोना बाधितांना पारनेरमधील ग्रामीण रूग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Jawahar Navodaya Vidyalaya Takli Dhokeshwar</p></div>
पारनेर नगरपंचायतीसाठी 89 अर्ज दाखल : विजय औटींच्या पत्नी निवडणूक रिंगणात

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी ( ता. 23 ) विद्यालयातील 9 विद्यार्थ्यांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या तपासणीत विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले. या सर्वांच्या संपर्कात असलेले 10 जणांची तपासणी केली असता ते ही बाधित निघाले. ही संपर्क साखळी दिवसा गणित वाढत आहे. आतापर्यंत 82 जण बाधित आढळून आले असून यात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

<div class="paragraphs"><p>Jawahar Navodaya Vidyalaya Takli Dhokeshwar</p></div>
कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचे टेन्शन : मुंबई पालिका आयुक्तांच्या यंत्रणेला सूचना

सर्व कोरोना बाधितांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले आहेत. विद्यालयात पारनेर, संगमनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, नगर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे. इयत्ता दहावी व बारावीची अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालयामध्ये बाहेरून आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून बाधा झाली असण्याची शक्यता आहे. नवोदय विद्यालयाच्या प्रशासन व पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

या घटनेची माहिती समजताच तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे, डॉ. अन्विता भांगे, डॉ. स्वाती ठुबे या आरोग्य विभागाच्या पथकाने संशयितांचे नमुने घेतले आहेत. 82 कोरोना बाधित आढळून आल्याने विद्यार्थी व पालकांचे तसेच शिक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.