Bhanudas Murkute Vs Vandana Murkute

Bhanudas Murkute Vs Vandana Murkute

Sarkarnama

अशोक कारखाना निवडणुकीत सासरा विरुद्ध सून असा सामना रंगणार

श्रीरामपूर ( Shrirampur ) तालुक्यातील अशोक नगर येथे असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

बापूसाहेब कोकणे

टाकळीभान ( जि. अहमदनगर ) : श्रीरामपूर तालुक्यातील अशोक नगर येथे असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. In Ashok Sugar Factory election, a match will be played between Father-in-law and daughter-in-law

अशोक सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी लोकसेवा मंडळाकडून, तर त्यांच्या स्नुषा पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी शेतकरी संघटनेकडून टाकळीभान गटातून सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सासरा विरुद्ध सून अशा लढतीची शक्यता राजकीय विश्‍लेषक वर्तवत आहेत.

Bhanudas Murkute Vs Vandana Murkute

माजी आमदार भानुदास मुरकुटे लागले लोकसभेच्या तयारीला

टाकळीभान, भोकर, कमालपूर, घुमनदेव, घोगरगाव, बेलपिंपळगाव अशी सहा गावे असलेल्या गटात दोन हजार 597 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सन 1987 ते आजतागायत माजी आमदार मुरकुटे हे टाकळीभान गटातून निवडणूक लढवीत एक हाती कारखान्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. डॉ. वंदना मुरकुटे यांनी गेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या टाकळीभान गणातून एक हजार 250 मताधिक्याने विजयी होऊन भानुदास मुरकुटे यांना धक्का दिला होता.

Bhanudas Murkute Vs Vandana Murkute

श्रीरामपूरसाठी भानुदास मुरकुटे, करण ससाणे आले एकत्र

आता अशोकच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीने मोठी चुरस निर्माण होणार आहे, अशा चर्चेला आतापासूनच उधाण आले आहे. दोन्ही मुरकुटे एकमेकासमोर उभे ठाकतात की नाही, हे पाहण्यासाठी चार जानेवारी पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Bhanudas Murkute Vs Vandana Murkute

सात महिन्यांच्या न्यायालयीन लढ्यानंतर अखेर डॉ. वंदना मुरकुटे सभापदी विराजमान

डॉ. वंदना मुरकुटे यांनी महिला राखीव, ओबीसी व सर्वसाधारण मतदारसंघ, असे तीन उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी टाकळीभान गटातूनच सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे व तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com