अकोलेत NCP मध्ये उभी फूट : अशोक भांगरेंचा सवतासुभा

ही निवडणूक माजी मंत्री मधुकर पिचड ( Madhukar Pichad ) व NCP चे आमदार डॉ. किरण लहामटे ( Kiran Lahamte ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
NCP
NCPSarkarnama

अकोले (अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) व काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत आहे. ही निवडणूक माजी मंत्री मधुकर पिचड ( Madhukar Pichad ) व आमदार डॉ. किरण लहामटे ( Kiran Lahamte ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे अकोले शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. तर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दुफळी माजली आहे. In Akole, the NCP split into two parts: Ashok Bhangre split

राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे व आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यात दरी निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. याचा फायदा कुणाला होणार असा सूर ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागला आहे. भांगरे व लहामटे यांचे कार्यकर्ते एकमेकांपासून सटकून असल्याचे चित्र समोर आले आहे.

NCP
आमदार लहामटे साहेब स्टंटबाजी बंद करा - दीपक वैद्य

माजी आमदार वैभव पिचड हे विधानसभेत गेल्यानंतर रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर भाजप पक्षच्या समोर विजय भांगरे, दिलीप भांगरे, दत्ता देशमुख, बाळासाहेब देशमुख यांची नावे चर्चेत होती. मात्र या जागेवर मनसेमध्ये असलेले डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी देण्यास यमाजी लहामटे, किरण माळवे, श्रीनिवास एलमामे यांनी आग्रह धरला होता. अशोक भांगरे त्यावेळी अकोले तालुक्यातील भाजपमध्ये सर्वेसर्वा होते. आपल्या दोन्ही भावांना बाजूला सारत मोठ्या मनाने डॉ.किरण लहामटे यांना पसंती देण्यात आली. त्यांचा मनसेतून प्रवेश भाजपमध्ये करण्यात आला. वैद्यकीय प्रशिक्षणाला गेलेले लहामटे फुलस्टॉप देऊन घरी आले. उभे राहिले व निवडून आले.

किरण लहामटे निवडून आल्यावर अशोक भांगरे, जालिंदर वाकचौरे आनंदीत झाले. सातेवाडी गटात भांगरे यांनी त्यांना साथ दिली. विधानसभेत बेल भंडार घेऊन एकत्र येण्याचे ठरले व विधानसभेतही भांगरे यांनी माघार घेऊन. लहामटे यांना आमदारकीचे तिकीट दिले व निवडूनही आणले. मात्र त्यानंतर संबंध दृढ होण्याऐवजी संबंध बिघडत गेले.

NCP
डॉ. किरण लहामटे म्हणाले, सत्ता द्या विकास पहा...

भांगरे यांचे कार्यकर्ते दीपक वैद्य यांनी आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याने ते भाजपच्या संपर्कात गेले. आदिवासी विकास प्रकल्प स्तरीय समितीच्या अध्यक्षा सुनीता भांगरे यांना देखील अध्यक्ष पदावरून संचालक करण्यात आले. नगरपंचायत निवडणुकीत भांगरे समर्थक असलेल्या डॉ. रामहरी चौधरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारण्यात आली. डॉ. चौधरींसाठी भांगरे आग्रही होते. नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची माहिती भांगरे यांना देण्यात आली नाही. त्यामुळे अशोक भांगरे व त्यांचे समर्थक नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतच उभी फुट पडली असल्याचे चित्र आहे.

NCP
अशोक भांगरे म्हणाले, स्वस्त धान्य काळा बाजार प्रकरणातील सूत्रधार शोधा...

त्यामुळेच अशोक भांगरे यांनी आमदार किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांच्या रेशन घोटाळ्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. या राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी बँकेतील ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर व आमदार किरण लहामटे यांच्यात सख्य आहे. अगस्ती कारखान्यातील अनियमितते बद्दल अशोक भांगरे यांनी शेतकरी नेते दशरथ सावंत, बी.जे.देशमुख यांची साथ करत थेट साखर आयुक्त यांचेकडे गायकर यांची तक्रार केली आहे. त्यामुळे गायकर यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. त्यामुळे गायकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अशोक भांगरे यांच्याबद्दल तक्रार केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये धुसफूस सुरू झाली आहे, अशातच उद्या ( शनिवारी ) अजित पवार अकोले येथे निवडणूक प्रचाराला येणार आहे. त्यावेळी काय राजकीय नाट्य घडते यावर अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com