Ahmednagar Politics : आंदोलनातून अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचा उमटला आवाज...जिल्हाध्यक्षही आले धावून!

NCP News : मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुख:द घटना आहे.
NCP News
NCP NewsSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुख:द घटना आहे. ही घटना अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज (ता.२५) अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने महात्मा गांधी यांचे पुतळ्यासमोर काळी फित बांधून व मौन आंदोलन करण्यात आले. या वेळी मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत निषेध करण्यात आला.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अहमदनगरचे संग्राम जगताप आघाडीवर होते. नगर शहरावर जगताप पिता-पुत्रांचा एकहाती प्रभाव आहे तसा राष्ट्रवादी पक्षातही आहे. त्यामुळे जगताप आणि माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, शहर जिल्हाध्यक्ष आदी सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजितदादांच्या गटात सहभागी झाल्याने शहरात शरद पवार (Sharad Pawar) गट काहीसा पोरका झाल्याचे चित्र होते.

NCP News
Assembly Session : अजितदादा, तुमचं आमचं काही वैर नाही, पण तुमच्या निर्मळ मनाचा वापर झाला पाहिजे; नाना पटोलेंचे आवाहन

काही मोजक्या कार्यकर्त्यांनी भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. शहरात मागील आठवड्यात माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या माध्यमातून माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत शरद पवार गटात प्रवेश केला. मरगळ आलेल्या राष्ट्रवादी पवार गटाला एकमोठी ताकत मिळाल्याचे बोलले जाऊ लागले. त्याचाच एक भाग म्हणून मणिपूर घटनेवर मौन धारण करत केलेले आंदोलन शरद पवार गटाचा आवाज शहरात एक प्रकारे पुनर्जीवित होत असल्याचे म्हणावे लागेल.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शहर कार्याध्यक्ष नामदेव पवार, अशोक बाबर, किसनराव लोटके, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, पापामिया पटेल, फारूक रंगरेज, किसनलाल बेदमुथा आदीसह शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP News
Pimpri-Chinchwad : चिंचवडच्या नव्या आमदार अश्विनी जगतापांची विधानसभेत जोरदार बॅटिंग

राजेंद्र फाळके म्हणाले, मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुख:द घटना आहे. याचे पडसाद देशातील विविध राज्यात सतत उमटत आहेत. यामुळे देशातील सर्व महिला वर्गामध्ये तीव्र असंतोष आहे. कळमकर म्हणाले, मणिपूर घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला खडे बोल सुनाववे. हे सरकारचे दुर्देव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी निषेध आंदोलन केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com