२०२४ ला साताऱ्याचा खासदार भाजपचाच होणार

Satara : भाजपने देशातील लोकसभेच्या १४४ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.
Som Prakash, MLA Jaykumar Gore
Som Prakash, MLA Jaykumar GoreSarkarnama

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव जगात सर्वात प्रतिभाशाली नेता म्हणून घेतले जात आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांत गरीब, शेतकरी, वंचितांसाठी विविध योजना आणल्या. भ्रष्टाचाराला नष्ट करणे हे त्यांचे लक्ष आहे. सर्वसामान्यांसाठी दिलेल्या या योजनांमुळेच तसेच देशाला बळकट करण्यासाठी सातारा लोकसभा मतदार संघ २०२४ मध्ये भाजपचाच (BJP) असेल,' असा विश्वास केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी व्यक्त केला.

Som Prakash, MLA Jaykumar Gore
लाईट आली नसती तर तू वाचलाच नसतास..शंभूराज अधिकाऱ्यांवर कडाडले

सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात भाजपने आयोजित केलेल्या लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, ॲड. भरत पाटील, सुवर्णा पाटील, विकास गोसावी आदी उपस्थित होते.

सोम प्रकाश म्हणाले, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनले तेव्हापासून त्यांनी देशातील गोरगरीब जनता केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरु केल्या आहेत. करोडो लोकांना आज त्याचा लाभ होत आहे. कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण मिळवता आले. जगात फक्त पंतप्रधान मोदी हेच प्रभावशाली नेतृत्व आहे. त्याचा आम्हाला गर्व आहे. भारत महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आता आमचे लक्ष भ्रष्टाचार नष्ट करणे असून त्यावर काम सुरू आहे. भाजपने २०२४ ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू केली असून साताऱ्यातून भाजपाचा खासदार निवडून संसदेत जाणार आहेत,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Som Prakash, MLA Jaykumar Gore
शंभुराज देसाईंनी सांगितले शिंदे सरकारचे वास्तव; राज्याच्या तिजोरीत पैसेच नाहीत

यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांचे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम सुरु आहे. त्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. आता भाजपने देशातील लोकसभेच्या १४४ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १६ असून सातारा त्यापैकी एक आहे. २०२४ च्या निवडणुकीत मतदारसंघ जिंकणे भाजपचे लक्ष आहे. तर केंद्र शासनाने विविध योजना आणल्या. कोरोना संकटात लोकांना आधार दिल्या. अशा सरकारबद्दल सतत दररोज सकाळी बोलणारे जेलमध्ये गेले आहेत. आता सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार करण्याबरोबरच जिल्ह्यात पाच आमदार भाजपचे करण्यासाठी नियोजन सुरु आहे.

जयकुमार गोरेंच्या तोंडी काँग्रेसचा उच्चार

आमदार जयकुमार गोरे यांनी भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीलाच काँग्रेसच्या जमलेल्या पदाधिकाऱ्यांनो असे त्यांनी उच्चारताच सभागृहात एकच हशा पिकला. पुढे त्यांनी स्वत:ला सावरत हसलात का सगळे, तुम्हाला सगळ्यांना हसण्यासाठी असे बोलावे लागले, असे म्हणून या सातारा जिल्ह्यात आता भाजपाचे दोन आमदार आहेत. २०२४ च्या निवडणूकीत चार होतील. सोम प्रकाश साहेब तुमच्या आजुबाजूला बसले आहेत ते सारे आमदार होतील, खासदारही भाजपाच होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवेंद्रराजेंची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विचार घेतल्याशिवाय जगातील निर्णय होत नाहीत. मोदींनी जगात स्वत:चे आणि भारताचे नाव उंचावले आहे. भाजपमुळेच लाभार्थ्यांना थेट अनुदान मिळत आहे. त्यासाठी शिफारस लागत नाही. या उलट काँग्रेसच्या काळात लोकांना कधीही थेट लाभ मिळाला नाही, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in