पारनेरमधील नगरसेवकाच्या तालमीत अनुचित प्रकार : गुन्हा दाखल

शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे याच्या मालकीच्या तालमीत अल्पवयीन मुलासमवेत समलैगिंक अत्याचाराचा प्रकार घडल्याचा आरोप आहे.
Crime
CrimeSarkarnama

अहमदनगर - पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेचे ( Shivsena ) नगरसेवक युवराज पठारे याच्या मालकीच्या तालमीत अल्पवयीन मुलासमवेत समलैगिंक अत्याचाराचा प्रकार झाल्याचा आरोप आहे. हा प्रकार दडपण्यासाठी युवराज पठारे व त्याच्या साथीदारांनी अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील व वडिलांच्या दोन मित्रांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या संदर्भातील गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात आज पहाटे दाखल झाला. मुलांच्या भांडणाला राजकीय स्वरूप देऊन खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे जिल्हा तालीम संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सेनापती बापट व पराशर ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तालुक्यात नक्की काय चालले आहे यावर उलट सुलट चर्चा रंगली आहे. ( Improper type in the training of corporator in Parner: Crime filed )

अल्पवयीन मुलगा व त्यांचे वडील रात्री उशिरा पारनेर पोलिस ठाण्यात आले. त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पहाटेपर्यंत पोलिसांनी बाललैंगिक अपराधासह लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. नगरसेवक युवराज पठारे, विशाल सर ( पूर्णनाव माहिती नाही ), आकाश ( पूर्णनाव माहिती नाही ) व विशाल सर ( पूर्णनाव माहिती नाही ) अशी आरोपींची नावे आहेत.

Crime
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

फिर्यादीत म्हंटले आहे की, या मुलाला उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. त्यामुळे त्याला कुस्ती शिकण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला पारनेर येथील नगरसेवक युवराज पठारे यांच्या शिवछत्रपती नावाच्या तालमीत टाकले. तेथे विशाल सर ( पूर्णनाव माहिती नाही) यांनी तालमीत दाखल होताच मोबाईल जप्त केले. आकाश नावाच्या मुलाने समलैंगिक अत्याचार केला. या विरोधात मुलाने विशाल सर व युवराज पठारे यांना सांगितले. या दोघांनी आकाशवर कारवाई करण्या ऐवजी अल्पवयीन मुलालाच हे प्रकरण कोणाला सांगू नये यासाठी एका खोलीत दोन दिवस कोंडून ठेवले. अखेर मुलाने कोणाला सांगणार नाही असे सांगितल्यावर त्याला त्याचा मोबाईल देण्यात आला. मात्र मुलाने काल ( ता. 15 ) घडलेली सर्व हकीकत वडिलांना दुरध्वनीवरून सांगितली. तसेच अंगावरील मारहाणीच्या खुणांची छायाचित्रे काढून पाठविली.

त्यानुसार मुलाचे वडील त्यांच्या दोन मित्रांसह तालमीत आले. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत विशाल सर याला जाब विचारला असता विशाल सर याने मुलाच्या वडिलांची कॉलर पकडली. ही बाब कोणीतरी युवराज पठारे यांना सांगितली. युवराज पठारे तालमीत आले. त्यांनी मुलाच्या वडिलांना व त्यांच्या दोन मित्रांना मारहाण करण्यास तालमीतील लोकांना सांगितले. त्यानुसार त्यांना तालमीतील लोकांना मारहाण केली. पोलिसांत तक्रार देणार नाही व प्रकरण कोणाला सांगणार नाही या अटीवर संबंधित मुलगा, त्याचे वडील व त्यांच्या दोन मित्रांना तालमीच्या बाहेर जाऊ दिले. युवराज पठारेच्या माणसांनी मुलगाच्या वडिलांच्या वाहनाचा सुप्यापर्यंत पाठलाग केला, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Crime
कोण म्हणतं मी राजकारणातून बाजूला गेलो : विजय औटी

पारनेर तालुका हा सुसंस्कृत लोकांचा तालुका समजला जातो. राज्याला शिक्षक पुरविणाऱ्या या तालुक्यात मागील काही वर्षांपासून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. युवराज पठारे हे अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर अज्ञात स्थळी निघून गेल्याचे समजले. ही घटना बनाव असल्याचे जिल्हा तालीम संघाचे म्हणणे आहे. या घटनेची कारणे काय असतील यावरून तालुक्यात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

मुळात घटना वेगळी आहे. यात राजकीय आकसापोटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन मुलगा दोन वर्षांपासून या तालमीत प्रशिक्षण घेत आहे. या तालमीत केवळ मुलगे आहेत. मुली नाहीत. या तालमीतील दोन मुलांत झालेल्या वादाला चुकीचे स्वरूप देण्यात येत आहे. लाल मातीत कोणीही राजकारण आणू नये. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखे मोठे नेतेही कुस्तीच्या संघटनेत आहेत. मात्र त्यांनी खेळात कधी राजकारण आणले नाही. त्यांचा आदर्श लोकांना घ्यावा. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सत्य समोर आणावे.

- वैभव लांडगे, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा तालीम संघ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com