Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतरासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरु; नगर महापालिकेला महत्त्वाचे आदेश...

Ahmednagar News : पण अहमदनगरच्या नामांतराची मागणी जिल्ह्यातून करण्यात आलेली नाही
Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतरासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरु; नगर महापालिकेला महत्त्वाचे आदेश...

Ahmednagar News : औरंगाबादच्या नामांतरानंतर आता राज्य सरकारने अहमदनगर च्या नामांतराच्या हालचाली सुरु केला आहे. पण अहमदनगर स्थानिक ठिकाणाहून कुणाचीही मागणी नसताना राज्य सरकारने नगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत हालचाली सुरु केल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारने महापालिकेला पत्र पाठवून महासभेत अहमदनगरच्या नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप आमदार राम शिंदे आणि महादेव जानकर यांनीही नगरच्या नामांतराच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. दरम्यान जुन २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली होती. अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगरमधल्या चौंडी गावात झाला, या कारणास्तव नगरच नामांतर करावं, असं पडळकर यांनी पत्रात नमूद केलं होतं. याच पत्राच्या अनुशंगाने शासनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये नगर महापालिकेला आदेश देत नामांतराबाबत बहुमताचा ठराव करून मागवण्यात आला आहे.

Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतरासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरु; नगर महापालिकेला महत्त्वाचे आदेश...
BJP Mission 144 : जे.पी नड्डा आज चंद्रपूर दौऱ्यावर येणार: काय आहे कारण?

दरम्यान जिल्ह्याच्या नामांतराबाबत अधिनियमात कोणताही ठराव करण्याची गरज नसल्याने महापालिका प्रशासनाचाही सध्या गोंधळ उडाला आहे. कारण महापालिका अधिनियमात असा कोणताही ठराव करण्याची तरतूद नसताना आणि हे महापालिकेच्या अखत्यारित येत नसतानाही सरकारने ठराव मागितला आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे.

दुसरीकडे महासभा घेऊन नगरच्या नामांतराबाबत ठराव पाठवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानंतर आता नामांतराचा विषय महासभेत ठेवण्याची भूमिका महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. सध्या नगर महापालिकेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आता नामांतराच्या ठरावाला नगरसेवक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in